प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता सुनील शेट्टी याने गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता त्याच्या मुलाने बॉलिवूडमध्ये ग्रँड एन्ट्री केली आहे. त्याचा मुलगा अहान शेट्टी याचा पहिला चित्रपट ‘तडप’ शुक्रवारी (३ डिसेंबर) मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी, या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. ज्यामध्ये असे काही घडले आहे, जे सध्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अहान शेट्टीचा हा पहिलाच चित्रपट आहे. याचे स्क्रिनिंग मुंबईमध्ये करण्यात आले. हा अहान शेट्टीच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता. परंतु, सर्वांच्या नजरा अहान शेट्टीवर नव्हे, तर त्याची बहीण अथिया शेट्टी वर होत्या. तिने रेड कार्पेटवर ज्याप्रकारे एन्ट्री घेतली, ते पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. यामागील प्रमुख कारण म्हणजे प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल. अथिया शेट्टीसोबत केएल राहुलने रेड कार्पेटवर एन्ट्री केली होती.
Lovebirds #AthiyaShetty and #KLRahul were photographed on the red carpet as she attended the premiere of #Tadap last night. pic.twitter.com/hfHfbmVicT
— Filmfare (@filmfare) December 2, 2021
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांची जोडी नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. अनेकदा हे दोघे सोबत दिसून आले आहेत. हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचेही म्हटले जात आहे. त्यातच बुधवारी (१ डिसेंबर) झालेल्या ‘तडप’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे दोघे ही पोज देताना दिसून आले होते. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतायेत.
K L Rahul arrives for Special Screening of Movie #Tadap in Mumbai,
Can't wait to watch this movie 🤩@klrahul11 • #TadapSpeacialScreening @SunielVShetty @theathiyashetty pic.twitter.com/BcbFEeK8lo
— K L Rahul FANS (@itsPRB) December 1, 2021
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी रेड कार्पेटवर एकत्र एन्ट्री करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण केएल राहुल शेट्टी कुटुंबासोबत पोज देताना दिसून आला आहे. या कार्यक्रमासाठी अथिया शेट्टीने काळया रंगाचा ड्रेस घातला होता, तर केएल राहुलने क्रीम रंगाचा सूट घातला होता. या दोघांची जोडी संपूर्ण कार्यक्रमात चर्चेचा केंद्रबिंदू होती. यासह अहान शेट्टी देखील या कार्यक्रमात आपली गर्लफ्रेंड तानिया श्रॉफ सोबत पोज देताना दिसून आला.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाला धूळ चरण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ गोलंदाज जडेजाच्या व्हिडिओ पाहून करतोय सराव
ठरलं तर! ऍशेसमध्ये यष्टीमागे पेनची जागा घेणार ‘हा’ खेळाडू, कसोटी पदार्णाचीही मिळणार संधी