---Advertisement---

रोहित कसोटी मालिकेतून ‘आऊट’ झाल्यानंतर मयंकसोबत सलामीसाठी ‘हे’ तिघे दावेदार, १ नाव अनपेक्षित

On: गुरूवार, डिसेंबर 16, 2021 5:33 PM
Rohit-Sharma-Mayank-Agarwal
---Advertisement---

भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी (south africa tour of india) गुरुवारी (१६ डिसेंबर) रवाना झाला. भारताला दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेची सुरुवात २६ डिसेंबरपासून होणार आहे. परंतु कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला एक वाईट बातमी मिळाली होती. कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. अशात रोहितच्या जागी भारतीय संघाचा डाव कोणता खेळाडू सुरू करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

रोहितला दुखापत झाल्यामुळे मयंक अगरवालसोबत कोणता फलंदाज भारताच्या डावाची सुरुवात करणार याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. डावाची सुरुवात करण्यासाठी शुभमन गिलदेखील उपस्थित नसणार आहे. अशात संघातील तीन खेळाडूंची नावे प्रामुख्याने समोर येत आहेत. आपण या लेखात अशाच तीन भारतीय खेळाडूंची माहिती घेणार आहोत, जे दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत मयंक अगरवालसह डावाची सुरुवात करू शकतात.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत मयंक अगरवासोबत सलामीसाठी उपस्थित राहू शकतील असे तीन खेळाडू –

केएल राहुल (KL Rahul) –
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध रोहितच्या जागी सलामीसाठी येणाऱ्यांच्या यादीत सर्वात पहिले नाव केएल राहुलचे आहे. केएल राहुल दुखापतीमुळे याआधी खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उपलब्ध नव्हता. त्यापूर्वी इंग्लंड संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते आणि अप्रतिम प्रदर्शन देखील करून दाखवले होते. इंग्लंड संघाविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात त्याने १२९ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच ओव्हल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात ४६ धावा केल्या होत्या.

प्रियांक पांचाल (Priyank Panchal) –
रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी प्रियांक पांचाल याला संघात सामील केले गेले. भारतीय संघाच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी भारत अ संघ देखील दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर गेला होता आणि या संघाचे नेतृत्व प्रियांक पांचालने केले होते. प्रियांकला आगामी मालिकेत रोहितच्या बदल्यात संघात सामील केले गेले आहे. त्यामुळे तो सलामीला फलंदाजी करण्यासाठी येईल असी शक्यता वर्तवली जात आहे.

हनुमा विहारी (Hanuma Vihari) –
हनुमा विहारी यापूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर खेळाडू राहिला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली होती. आगामी मालिकेसाठी देखील त्याला संघात निवडले गेले आहे. तो मागच्या बऱ्याच काळापासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत जत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले, तर तो रोहितच्या जागी सलामीवीराची भूमिका पार पाडू शकतो.

महत्वाच्या बातम्या –

थोडं नशीब थोडी मेहनत! ४ वर्षांनंतर स्टीव्ह स्मिथ झाला पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार, ‘हे’ आहे कारण

जरा इकडे पाहा! टी२० मध्ये सहा षटकार खाणाऱ्या ब्रॉडचा कसोटी क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

‘जोकर’, ‘दयाबेन’ आणि बरंच काही! विराटच्या पत्रकार परिषदेनंतर भन्नाट मिम्स व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---