केएल राहुल बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात कर्णधाराच्या भूमिकेत दिसला. रोहित शर्मा दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. याच कारणास्तव तिसऱ्या वनडे सामन्यात त्याच्या जागी इशान किशन सलामीसाठी आला आणि केएल राहुल संघाचे नेतृत्व करताना दिसला. इशान किशनसाठी हा या मालिकेतील पहिला सामना होता, ज्यामध्ये त्याने द्विशतक केले आणि कौतुकाचा धनी ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर केएल राहुलने सामना संपल्यानंतर खास प्रतिक्रिया दिली.
इशान किशन (Ishan Kishan) या सामन्यात 131 चेंडूत 210 धावा करू शकला. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक आणि द्विशतक शतक ठरले. भारताने इशान किशन आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या झंजावाती खेळीच्या जोरावर 50 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 409 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश 34 षटकांमध्ये 182 धावा करून सर्वबाद झाला. भारताने 227 धावांनी विजय मिलवला, पण मालिकेत मात्र संघाला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. असे असले तरी, संघाला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. केएल राहुलच्या मते तिसऱ्या वनडेतील विजयानंतर कसोटी मालिकेपूर्वी संघाचा आत्मविश्वास वाढेल.
केएल राहुल (KL Rahul) म्हणाला की, “संघाकडून अशीच अपेक्षा होती. विराट आणि इशानने आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. इशानने या सामन्यात मिलालेल्या संधी दोन्ही हातांनी झेलली आहे. त्याने चांगली गोलंदाजी केली.” राहुलने इशानसोबत 209 धावांची भागीदारी करणाऱ्या विराट कोहलीचेही कौतुक केले. “विराटने त्याच्या अनुभवाच्या जोरावर संघाला मार्गदर्शन केले,” असे तो म्हणाला.
“संघाच्या या प्रदर्शनावर मी खुश आहे. आम्ही एका संघाच्या रूपात शिकत आहोत. अजूनही सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आहोत. आमचे नशीब चांगले, कारण मागच्या दोन सामन्यांमध्ये निकाल आमच्या बाजूने लागला नाही. या विजयानंतर कसोटी मालिकेसाठी आमचा आत्मविश्वास वाढेल,” असेही राहुल पुढे बोलताना म्हणाला. विरोधी संघाचा कर्णधार लिटन दास याने देखील विराट आणि इशानच्या खेलीचे कौतुक केले. दासच्या मते या दोघांमुळे सामना बांगलादेशच्या हातातून निसटला.
“इशान आणि विराटने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळेच सामना आमच्या हातातून निसटला. इशानने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती खूपच आक्रमक होती. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले, पण त्यांना बाद करण्याची कोणतीच पद्धत मिळाली नाही. भारताची धावसंख्या 330-340 धावांपर्यंत असती, तर सामना नक्कीच सामना वेगळा असता. भारत एक चांगला संघ आहे आणि आम्ही देखील दोन सामन्यांमध्ये चांगल्या क्रिकेटचे प्रदर्शन केले आहे. या गोष्टीमुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे.” (KL Rahul and Liton Das praised the Indian team and Ishan Kishan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्विशतक ईशानचं, पण लक्ष वेधतोय विराटचा भांगडा; व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय
ईशान किशन वर्षाला कमवतोय ‘एवढे’ कोटी, त्याबरोबर कोटींच्या गाड्या आहेत घरात






