---Advertisement---

अखेर चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला! आशिया चषकासाठी राहुल अणि अय्यरचे संघात कमबॅक

KL Rahul with Shreyas Iyer
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात परतले आहेत. बराच काळ  राहुल आणि श्रेयसखापतीशी झुंजत होते. मात्र आता दोन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत.

आयपीएल 2023 च्या हंगामात केएल राहुल (KL Rahul) शेवटचा मैदानावर दिसला होता. राहुलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दुखापत झाली होती. त्यानंतर तो संपूर्ण स्पर्धेत खेळू शकला नाही. मात्र, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचे पुनरागमन ही भारतीय चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

श्रेयस अय्यर तब्बल 5 महिन्यांनंतर मैदानात परतणार आहे.
श्रेयस अय्यरला अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान खेळला होता. फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळली गेली. यादरम्यान श्रेयसला दुखापत झाली. यामुळे श्रेयस आयपीएल 2023 च्या हंगामात खेळू शकला नाही. अशाप्रकारे श्रेयस तब्बल 5 महिन्यांनी मैदानात परतणार आहे. तर केएल राहुल तब्बल ४ महिन्यांनंतर मैदानात परतणार आहे.

काही दिवसांपासून भारतीय संघ फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर सतत अपयशी ठरत आहे. भारतीय संघाचे अनेक मुख्य खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होते. मात्र, भारतीय संघात श्रेयस आणि राहुलचे पुनरागमन झाल्यामुळे संघाचा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला आहे.

अशिया चषक 2023 स्पर्धेची सुरवात
30 ऑगस्टपासून आशिया चषकला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि नेपाळचे संघ 30 ऑगस्टला आमनेसामने असतील. भारतीय संघ आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 2 सप्टेंबरला खेळणार आहे. आशिया चषकाचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. पाकिस्तानशिवाय आशिया चषक श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेत खेळणार आहे. याशिवाय भारतीय संघाविरुद्धचे सामने श्रीलंकेच्या भूमीवर खेळवले जाणार आहेत. (kl rahul and shreyas iyer comeback in indian cricket team they selected for asia cup 2023)

महत्वाच्या बातम्या- 
आफ्रिदीचा टी10 मध्ये राडा! वयाच्या 43 व्या वर्षी केल्या 300 च्या स्ट्राईक रेटने धावा
आफ्रिदीचा टी10 मध्ये राडा! वयाच्या 43 व्या वर्षी केल्या 300 च्या स्ट्राईक रेटने धावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---