बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 गडी राखून विजय मिळवला. ढाका येथे झालेल्या या सामन्यात भारताने आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्या महत्वपूर्ण खेळीने रोमांचक विजय मिळवला. भारतीय संघाने मालिका नावे केली असली तरी, केएल राहुल व विराट कोहली या अनुभवी फलंदाजांचे अपयश नजरेत भरणारे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी त्यांच्या या खराब फॉर्मविषयी चर्चा होताना दिसते.
भारतीय संघाने बांगलादेशला घरच्या मैदानावर पराभूत करताना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे आपली वाटचाल सुरू ठेवली. या मालिकेत भारतासाठी चेतेश्वर पुजारा हा सर्वाधिक यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 4 डावात 222 धावांसह मालिकावीर पुरस्कार आपल्या नावे केला. पुजारा हा वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघातून खराब कामगिरीमुळे बाहेर गेला होता. मात्र, त्याने काऊंटी क्रिकेट व देशांतर्गत क्रिकेटचा मार्ग धरला. तेथे चांगली कामगिरी केल्यानंतर त्याने संघात पुनरागमन केले.
सध्या हीच परिस्थिती केएल राहुल व विराट कोहली यांच्याबाबत दिसून येते. राहुलने 2022 या वर्षामध्ये 4 कसोटी सामने खेळताना 8 डावात 17 च्या सरासरीने केवळ 137 धावा केल्या. ज्यामध्ये फक्त एका अर्धशतकचा समावेश आहे. दुसरीकडे, विराट कोहलीचे आकडेही या वर्षात चांगले नाहीत. कोहलीने 6 सामन्यांच्या 11 डावात 26.50 च्या सरासरीने एका अर्धशतकासह केवळ 265 धावा केल्या आहेत.
नव्या वर्षात सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी भारतीय संघात राहुल व विराट यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तिथे देखील त्यांचे कामगिरी अशीच राहिल्यास त्यांचा पत्ता कट होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी पुजाराकडून प्रेरणा घेत पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेट असे देखील काहींनी म्हटले आहे.
(KL Rahul and Virat Kohli should learn from Cheteshwar Pujara)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवानंतरही बांगलादेशी कर्णधार ऐटीतच! म्हणाला, ‘…तर सामन्याचा निकाल वेगळा असता’
सुनील गावसकरांवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास