लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२मधील ५३ वा सामना अतिशय रोमांचक राहिला. लखनऊने ७५ धावांनी हा सामना जिंकला. परंतु लखनऊचा कर्णधार केएल राहुल याने या सामन्यादरम्यान लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
राहुल (KL Rahul) या सामन्यात डायमंड डकचा (एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद) शिकार बनला. लखनऊकडून क्विंटन डी कॉकसोबत तो सलामीला फलंदाजीसाठी आला होता. डी कॉकने पहिल्या षटकातील पाच चेंडू खेळले. पाचव्या चेंडूवर डी कॉकने वेगाने फटका मारला आणि एक धाव घेण्यासाठी. परंतु कोलकाताकडून क्षेत्ररक्षण करत असलेल्या कर्णधार श्रेयस अय्यर याने त्वरित चेंडू पकडला. हे पाहून डी कॉक माघारी परतला. तोवर राहुल क्रिज सोडून खूप पुढे आला होता. परंतु त्यानेही वेगाने माघारी परतण्याचा प्रयत्न केला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मात्र श्रेयसने तोवर चेंडू थ्रो करत यष्ट्या उडवल्या होत्या. त्यामुळे एकही चेंडू न खेळता राहुलला पव्हेलियनला परतावे लागले. डायमंड डकवर (Diamond Duck) बाद झाल्यानंतर राहुलने माजी भारतीय फलंदाज आणि लखनऊ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे.
राहुल आयपीएलमध्ये डायमंड डक (KL Rahul Diamond Duck) होणारा दुसरा भारतीय सलामीवीर (बनला आहे. त्याच्यापूर्वी २०१३ मध्ये गंभीर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध डायमंड डकचा शिकार बनला होता. या २ सलामीवीरांव्यतिरिक्त आजवर कोणताही सलामीवीर आयपीएलमध्ये डायमंड डक झालेला नाही.
यापूर्वी २ वेळा गोल्डन डक झालाय राहुल
राहुल कोलकाताविरुद्ध डायमंड डकवर बाद होण्यापूर्वी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध गोल्डन डक झाला होता. अशाप्रकारे आयपीएल २०२२च्या हंगामात तो ३ वेळा भोपळाही न फोडता पव्हेलियनला परतला आहे.
राहुलच्या लखनऊकडून आहेत सर्वाधिक धावा
असे असले तरीही, राहुलने त्याच्या प्रदर्शनातील सातत्य राखून ठेवले आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळताना ४५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ शतके आणि २ अर्धशतकेही निघाली आहेत. तो चालू हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सात सामन्यांनंतर पुनरागमन करताना जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय
एका षटकात ३० धावा देत मावीने केकेआरची डुबवली नौका, लाजिरवाणा विक्रमही केला नावे