नुकतीच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका समाप्त झाली. या मालिकेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत भारतीय वनडे संघाचे कर्णधारपद केएल राहुलच्या हाती सोपवण्यात असेल होते. या मालिकेतील अंतिम सामन्यात देखील भारतीय संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह दक्षिण आफ्रिका संघाने ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली आहे. दरम्यान केएल राहुलच्या नावे (Kl Rahul) नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीनही वनडे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही मालिका दक्षिण आफ्रिका संघाने ३-० ने आपल्या नावावर केली. यासह कर्णधार म्हणून केएल राहुलच्या नावे कर्णधार म्हणून नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो भारतीय वनडे संघांचा कर्णधार म्हणून सुरुवातीच्या तीनही सामन्यात पराभूत होणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे.
व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener
दक्षिण आफ्रिका संघाने या संपूर्ण मालिकेत भारतीय संघावर आपला दबदबा कायम ठेवला होता. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात ३१ धावांनी तर, दुसऱ्या सामन्यात ७ गडी राखून आणि तिसऱ्या सामन्यात ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
वनडे मालिका पराभवानंतर केएल राहुल म्हणाला की, “दीपक चाहरमुळे आम्हाला वाटले होते की, आम्ही हा सामना जिंकू शकतो. परंतु शेवटी आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. आम्ही स्वतःला एक खरी संधी दिली. काहीतरी असे ज्यामधून आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. या सामन्यात स्पष्टपणे दिसून येत होते की, आम्ही कुठे चूक केली.”
भारतीय संघाचा ४ धावांनी पराभव
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना , २८७ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये क्विंटन डी कॉकने सर्वाधिक १२४ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला अवघ्या २८३ धावा करण्यात यश आले. ज्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ४ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
आख्खी टीम राष्ट्रगीतात मग्न असताना विराटचं सुरू होतं भलतंच काही, पाहून प्रचंड संतापले चाहते
भारतीयांची मनचं लई मोठी! शतकवीर डी कॉकची बुमराहने थोपटली पाठ, कर्णधार राहुलकडूनही कौतुक
हे नक्की पाहा: