आयपीएलच्या मैदानात रविवारी (२४ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स अशी लढत पाहायला मिळाली. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल चालू आयपीएल हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. राहुलने मुंबईविरुद्ध वानखडे स्टेडियमवर खेळताना खणखणीत शतक साकारले.
केएल राहुल (KL Rahul) आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध नेहमीच चांगली खेळी करत आला आहे. मुंबई इंडियन्ससोबत खेळताना त्याचे आकडे पाहिले, तर ते अप्रतिम राहिले आहेत. राहुलने मुंबई इंडियन्सविरुद्ध यापूर्वी दोन वेळा शतकी खेळी केली होती. रविवारी त्याने या संघाविरुद्ध तिसरे शतक ठोकले. या प्रदर्शनानंतर राहुल पहिला आणि एकमेव फलंदाज बनला आहे, ज्याने एकाच संघाविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये तीन वेळा शतकी खेळी आहे. राहुलव्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाहीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
राहुलने यापूर्वी २०१९ साली वानखडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांविरुद्ध नाबाद १०० धावा कुटल्या होत्या. चालू हंगामात लखनऊ आणि मुंबईचा हा दुसरा सामना आहे. पहिला सामना १५ एप्रिल रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये राहुलने नाबाद १०३ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता २४ एप्रिल रोजी वानखडे स्टेडियमवर खेळेलेल्या मुंबईविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात राहुलने पुन्हा एकदा नाबाद १०३ धावा केल्या आहेत.
Kaptaan sahab in absolutely fine form 👑 Take a bow @klrahul11 #AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/xwu1qaxVIr
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 24, 2022
दरम्यान, मुंबईविरुद्ध रविवारी खेळल्या गेगेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर लखनऊला प्रथम फलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने ६ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा साकारल्या. राहुलव्यतिरिक्त इतर कोणताही खेळाडू लखनऊसाठी २५ धावांचा टप्पा पार करू शकला नाही.
राहुल बनला टी२० क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध तीन शतके ठोकणारा पहिला खेळाडू
नाबाद १०० विरुद्ध मुंबई इंडियन्स- वानखडे स्टेडियम (२०१९)
नाबाद १०३ विरुद्ध मुंबई इंडियन्स- ब्रेबॉर्न स्टेडियम (२०२२)
नाबाद १०३ विरुद्ध मुंबई इंडियन्स- वानखडे स्टेडियम (२०२२)*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणारा कोहली, आता स्वत:च घेतोय विंडीजच्या दिग्गजाकडून धडे
कडकच ना! इकडं गुजरातला मिळाली विकेट अन् तिकडं हार्दिक पंड्याच्या पत्नीनं लावला ठुमका