---Advertisement---

कडकच ना! इकडं गुजरातला मिळाली विकेट अन् तिकडं हार्दिक पंड्याच्या पत्नीनं लावला ठुमका

Natasa-Stankovic
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्याने सामील झालेला गुजरात टायटन्स हंगामात शानदार कामगिरी करत आहे. शनिवारी (दि. २३ एप्रिल) आयपीएलच्या १५व्या हंगामातील ३५व्या सामन्यात गुजरातने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ८ धावांनी सामना जिंकत सहावा विजय खिशात घातला. या विजयानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने गुणतालिकेत पुन्हा एकदा टॉप केला.

सामन्यादरम्यान गुजरात टायटन्सचा उत्साह वाढवण्यासाठी हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविकही (Natasa Stankovic) स्टेडियममध्ये उपस्थित होती. ज्यावेळी कोलकाताचा सलामीवीर सुनील नारायणला मोहम्मद शमीने लॉकी फर्ग्युसनच्या हातून बाद केले. यानंतर नताशाची रिऍक्शन पाहण्यासारखी होती. नारायण बाद झाल्यानंतर नताशा आनंदाने उड्या मारू लागली. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

पंड्याची शानदार खेळी
गुजरात टायटन्सच्या विजयात कर्णधार हार्दिक पंड्याचे (Hardik Pandya) मोलाचे योगदान होते. त्याने अवघ्या ४९ चेंडूत ६७ धावांची आतिषी खेळी केली. यात २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. पंड्याव्यतिरिक्त डेविड मिलरने २७ आणि यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने २५ धावांची उपयुक्त खेळी केली. या खेळींमुळे गुजरातने २० षटकांमध्ये १५६ धावांचे आव्हान उभे केले होते.

रसेलची तुफान खेळी व्यर्थ
या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघ २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावत १४८ धावाच करू शकला. कोलकाताकडून आंद्रे रसेलने शानदार गोलंदाजीनंतर फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्याने २५ चेंडूत ४८ धावांचा पाऊस पाडला. यामध्ये १ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. रसेल बाद झाल्यामुळे कोलकाताला सामन्यात पराभूत व्हावे लागले. गुजरातकडून मोहम्मद शमी, यश दयाल, राशिद खान यांनी २ विकेट्स घेतल्या. तसेच, अल्झारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते नताशा
हार्दिक पंड्याची पत्नी नताशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमी चाहत्यांसोबत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करतत असते. नताशा आणि हार्दिकने २०२०च्या सुरुवातीला आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यानंतर नताशाने जुलै २०२०मध्ये मुलगा अगस्त्यला जन्म दिला होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आमिर खानला हवीये आयपीएलमध्ये संधी, बॅटिंग पाहून तुम्हीच ठरवा मिळेल की नाही

आनंद गगनात मावेना! आयुष्यात पहिल्यांदाच चाहती सामना पाहण्यासाठी गेली स्टेडिअममध्ये अन् मिळाली थेट अनुष्काजवळची सीट

क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी! मुंबईच्या माजी खेळाडूने वयाच्या ४०व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---