आयपीएल 2024 च्या 34व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 8 गडी राखून मोठा विजय मिळवला. लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात केएल राहुलनं 53 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी खेळली. रवींद्र जडेजानं एक शानदार झेल घेऊन राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून रवींद्र जडेजानं 40 चेंडूत नाबाद 57 तर महेंद्रसिंह धोनीनं 9 चेंडूत नाबाद 28 धावा ठोकल्या. धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी शतकी भागीदारी केली. यासह दोघांनीही आपापलं अर्धशतकही पूर्ण केलं.
केएल राहुलनं अर्धशतक पूर्ण करताच चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक मोठा रेकॉर्ड मोडला. केएल राहुल आयपीएलमध्ये 25 अर्धशतक झळकवणारा पहिला विकेटकीपर फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीनं विकेटकीपर फलंदाज म्हणून 24 अर्धशतक झळकावले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्सचाच स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक आहे.
आयपीएलमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून सर्वाधिक अर्धशतक
25 – केएल राहुल
24 – महेंद्रसिंह धोनी
23 – क्विंटन डी कॉक
21 – दिनेश कार्तिक
18 – रॉबिन उथप्पा
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध एकवेळ लखनऊला लक्ष्य गाठणं सोपं जाणार नाही, असं वाटत होतं. मात्र केएल राहुलनं क्विंटन डी कॉक सोबत मिळून मोर्चा सांभाळला. या दोघांनी सलामीला येऊन 90 चेंडूत 134 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर लखनऊनं 177 धावांचं लक्ष्य 19 षटकांत 2 गडी गमावून सहज गाठलं.
आयपीएल 2024 च्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर, लखनऊ सुपर जायंट्स सध्या 8 अंकांसह पाचव्या स्थानी आहे. त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी 4 सामन्यात विजय मिळवला असून 3 सामन्यात त्यांचा पराभव झालायं.
महत्त्वाच्या बातम्या –
टिम डेव्हिड-कायरन पोलार्डला आयपीएलनं ठोठावला दंड, कोणत्या चुकीची मिळाली एवढी मोठी शिक्षा?
राहुल-डी कॉकनं मोडला स्वतःचाच विक्रम, भागीदारीच्या बाबतीत वॉर्नर-धवनला टाकलं मागे
IPL 2024 मध्ये ‘थाला’ अजूनही नाबादच! 255 च्या स्ट्राईक रेटनं करतोय गोलंदाजांची धुलाई