KL Rahul Records: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 10 जूलैपासून लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताकडून केएल राहुलने अप्रतिम कामगिरी केली. त्याने भारताकडून पहिल्या डावात अर्धशतक झळकावले आणि वीरेंद्र सेहवागला मागे टाकले. राहुल हा सेना देशांमध्ये ही मोठी कामगिरी करणारा भारताचा दुसरा आणि आशियातील तिसरा फलंदाज ठरला आहे. (KL Rahul vs Virender Sehwag)
केएल राहुल आता सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) सलामीवीर फलंदाज म्हणून 50+ धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे, तर तो आशियातील तिसरा आहे. राहुलने वीरेंद्र सेहवागचा मोठा रेकाॅर्ड मोडला आहे. राहुलपूर्वी वीरेंद्र सेहवागने सेना देशांमध्ये एकूण 10 वेळा 50+ धावा केल्या होत्या. पण आता राहुलने 11 वेळा 50+ धावा करण्यात यश मिळवले आहे. (Most 50+ scores overseas opener)
सुनील गावस्कर यांच्याकडे 7 देशांमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक 50+ धावा करण्याचा रेकाॅर्ड आहे. त्याने ही कामगिरी 19 वेळा केली आहे. दिमुथ करुणारत्ने दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने एकूण 12 वेळा 50+ धावा करण्याचा पराक्रम केला आहे. आता राहुल 11 वेळा 50+ धावा करून तिसऱ्या स्थानावर आहे. वीरेंद्र सेहवाग चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय, पाकिस्तानचा सईद अन्वर पाचव्या स्थानावर आहे आणि तमीम इक्बाल सहाव्या स्थानावर आहे.
सेना देशांमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारे आशियाई सलामीवीर-
19- सुनील गावस्कर
12- दिमुथ करुणारत्ने
11- केएल राहुल*
10- वीरेंद्र सेहवाग
10- सईद अन्वर
10- तमीम इक्बाल






