इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या हंगामाचा पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. असे असतानाच पंजाब किंग्स संघासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्यांचा नियमित कर्णधार केएल राहुलवर या हंगामातून बाहेर होण्याची नामुष्की ओढावू शकते.
राहुलला अपेंडिक्स त्रास (आन्त्रपुच्छाचा त्रास) होत आहे. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याबद्दल पंजाब किंग्सने ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी माहिती दिली की ‘केएल राहुलला काल रात्री ओटीपोटात खूप वेदना होत होत्या. त्याच्यावर ओषधांचाही परिणाम होत नसल्याने त्याला पुढील तपासणीसाठी इमर्जन्सी रुममध्ये नेण्यात आले. त्यावेळी त्याला अपेंडिक्सचा त्रास होत असल्याचे निदान झाले आहे. ही समस्या शस्त्रक्रियेनंतर सोडवली जाऊ शकते. त्याचमुळे त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.’
Praying for KL Rahul’s health and speedy recovery 🙏❤️#SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 pic.twitter.com/q81OtUz297
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 2, 2021
आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर
राहुलची शस्त्रक्रिया झाली तर त्याला आयपीएलच्या १४ व्या हंगामातून बाहेर जावे लागू शकते. कारण कदाचीत त्याला शस्त्रक्रियेसाठी बायोबबलमधून बाहेर जावे लागू शकते. तसेच परत यायचे झाले तर पुन्हा कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन त्याला संघात सामील व्हावे लागेल. मात्र, अजून तरी त्याच्या उपलब्धतेबद्दल पंजाब संघाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
पंजाबसाठी संमिश्र हंगाम
पंजाबने आत्तापर्यंत आयपीएलच्या १४ व्या हंगामात ७ सामने खेळले असून ३ सामने जिंकले आहेत आणि ४ सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यामुळे ६ गुणांसह ते ५ व्या क्रमांकावर आहेत.
केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये
केएल राहुलने मागील आयपीएलम हंगामातील फॉर्म या हंगामातही कायम ठेवला. तो १४ व्या आयपीएल हंगामात २७ सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ७ सामन्यांत ४ अर्धशतकांसह ३३१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जोस नव्हे फुल ‘जोश’! हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बटलरचे वादळी आणि विक्रमी शतक; ठरला चौथाच खेळाडू
टीम इंडियाने एकेवेळी घरचा रस्ता दाखवलेला क्रिकेटर मनोज तिवारी झाला आमदार
टीम इंडियाने एकेवेळी घरचा रस्ता दाखवलेला क्रिकेटर मनोज तिवारी झाला आमदार