शुक्रवारी (28 एप्रिल) रोजी आयपीएलमध्ये पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स असा सामना खेळला गेला. दोन्ही संघांकडून या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा काढल्या गेल्या. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 5 बाद 257 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघ 19.4 षटकात 201 धावा करून सर्वबाद झाला. लखनऊ 56 धावांनी विजय मिळवण्यात यशस्वी ठरले असला तरी, कर्णधार केएल राहुल अपयशी ठरला.
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर केएल राहुल याला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. मात्र, त्यानंतर देखील तो केवळ 12 धावा करू शकला. त्यानंतर मात्र मैदानावर धावांचा पाऊस पडला. सलामीवीर कायले मेयर्स याने 24 चेंडूत 54 धावा करून संघाला वेगवान सुरुवात दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आयुष बदोनी याने 43, चौथ्या क्रमांकावर स्टॉयनिसने 72 आणि त्यानंतर निकोलस पूरन याने पाचव्या क्रमांकावर खेळाताना 19 चेंडूत 45 धावा केल्या.
लखनऊ संघासोबत या हंगामात एक गोष्ट सातत्याने दिसून येत आहे की, कर्णधार केएल राहुल लवकर बाद झाल्यानंतर संघ मोठी धावसंख्या रचण्यात यशस्वी होतोय. राहुल आरसीबीविरुद्ध केवळ 18 धावांवर बाद झाल्यानंतर संघाने 213 धावांचा पाठलाग केला होता. चेन्नईविरुद्ध देखील तो वीस धावांवर बाद झाल्यानंतर संघाने 205 अशी मजल मारलेली. तर दिल्ली विरुद्धदेखील तो 8 धावांवर बाद झाल्यानंतर संघाला 193 पर्यंत पोहोचता आले होते.
त्याचवेळी राहुलने ज्या चार सामन्यांमध्ये संथ फलंदाजी केली. तिथे संघाला एकदाही 160 पर्यंत पोहोचता आले नाही. त्याने पंजाबविरुद्ध 56 चेंडूवर 72 व गुजरातविरुद्ध 61 चेंडूवर 68 धावा केलेल्या. राजस्थानविरुद्ध 32 चेंडूवर 39 व हैदराबादविरुद्ध 31 चेंडूवर त्याने 35 धावा केल्या होत्या. त्यामुळे राहुल स्वतःच आपल्या संघासाठी अशा पद्धतीने फायदेशीर ठरताना दिसतोय.
(KL Rahul Early Goes Helps Lucknow Supergiants In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
होऊ दे खर्च! बड्डेच्या दोन दिवस आधीच रोहितचे गिफ्ट चाहत्यांसमोर, हैदराबादच्या फॅनचा खास प्लॅन
“…तर विराटकडे WTC Final मध्ये नेतृत्व द्यावे”, रवी शास्त्रींनी सुचवली कल्पना






