रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे. जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. मंगळवारी (25 एप्रिल) या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयकडून 15 सदस्यीय संघाची घोषणा केली गेली. मात्र, त्याचवेळी माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या अंतिम सामन्यात विराट कोहलीकडे नेतृत्व देण्याविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
शास्त्री यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटले,
“भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत विजेतेपदाचा दावेदार असेल. मात्र, नियमित कर्णधार रोहित शर्मा काही कारणास्तव अनुपस्थित राहिल्यास विराट कोहलीकडे नेतृत्व देण्यात यावे. मागील वेळी केलेली चूक यावेळेस सुधारणे गरजेचे आहे.”
भारतीय संघाने 2021 मध्ये केलेल्या इंग्लंड दौऱ्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वात चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र, मालिकेतील अखेरचा सामना 2022 मध्ये खेळला गेला. त्यावेळी विराटने संघाचे नेतृत्व सोडले होते. तसेच नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त करत असल्याने जसप्रीत बुमराह याने कर्णधारपद भूषवले. परंतु, भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाल्याने मालिका बरोबरीत सुटली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना (World Test Championship Final 2023) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल येथे पार पडणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील हा सामना 7 जून ते 11 जून यादरम्यान पार पडणार आहे.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडलेला भारताचा 15 सदस्यीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
(Ravi Shastri Backs Virat Kohli As India Captain In WTC Final If Rohit Unavailable)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबविरुद्धचा सामना लखनऊने बनवला ऐतिहासिक! सर्वात मोठी धावसंख्या करणाऱ्यांमध्ये मिळवले स्थान
लखनऊसाठी हंगामातील सर्वोत्तम पावरप्लेपैकी एक! कायल मेयर्सच्या वादळी खेळीमुळे 10 षटकात 128 धावा






