---Advertisement---

‘आशा आहे पुढचे…’, आशिया चषक जिंकल्यानंतर केएल राहुलची प्रतिक्रिया चर्चेत

On: रविवार, सप्टेंबर 17, 2023 7:14 PM
KL Rahul
---Advertisement---

आशिया चषका 2023 भारताने जिंकला. अंतिम सामन्यात रविवारी (17 सप्टेंबर) भारताने श्रीलंकेला 10 विकेट्सने मात दिली आणि आठव्यांदा आशिया चषक ट्रॉफी उंचावली. मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या आणि सामनावीर देखील ठरला. सामना संपल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याची खास प्रतिक्रिया समोर येत आहे.

भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी अवघ्या 51 धावा हव्या होत्या. श्रीलंकन संघ प्रथम फलंदाजी करताना 15.2 षटकात 50 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य अवघ्या 6.1 षटकात एकही विकेट न गमावता गाठले. केएल राहुल याला फलंदाजी करण्याची वेळही आली नाही. पण विजयानंतर त्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. राहुल माध्यमांसमोर म्हणाला, “आशिया चषकात धावाही केल्या आणि यष्टीरक्षकाची भूमिकाही चांगली पार पाडली. माझ्या नावापुढे काही रिखाण्यांमध्ये मी टीक केली आहे (काही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत). पण पुढचे दोन महिने असाच चांगला फॉर्म कायम राहील, अशा अपेक्षा आहेत.”

दरम्यान, केएल राहुल याने आशिया चषक 2023 मधून संघात पुनरागमन केले. इंडियन प्रीमियर लीग 2023 दरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर मागच्या काही महिन्यांपासून तो एकही सामना खेळू शकला नव्हता. आशिया चषकात देखील त्याच्या खेळण्याबाबत संभ्रम व्यक्त केला जात होता. पण पाकिस्तानविरुद्ध त्याला खेळण्याची संधी दिली गेली आणि राहुलने शतक ठोकले. राहुलची 111* धावांची खेळी मॅच विनिंग ठरली. सोबतच आघामी वनडे विश्वचषकासाठी यष्टीरक्षक फलंदाजाचे संघातील स्थान जवळपास पक्के झाले. (KL Rahul gave a special reaction on winning the Asia Cup 2023)

आशिया चषक फायनलसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

श्रीलंका – पथुम निसांका, कुशल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना.

महत्वाच्या बातम्या – 
टीम इंडिया आशियाई क्रिकेटची सरताज! श्रीलंकेला नमवत 8 व्यांदा जिंकला आशिया कप
पंगा घेणाऱ्या श्रीलंकेला भारताने दाखवला इंगा! अखेर 24 वर्षांनंतर घेतला बदला, 1999मध्ये लंकेने काय केलेलं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---