KL Rahul creates history: सध्या भारत विरूद्ध इंग्लंड संघातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यादरम्यान दोन्ही संघात अटीतटीची लढत सुरू आहे. त्याच वेळी या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाला जास्त गरज असताना सलामीवीर केएल राहुलने शानदार शतक झळकावले आणि इतिहास रचला. (KL Rahul creates history with century on England field)
केएल राहुल इंग्लंड दौऱ्यावर भारतासाठी सलामीवीर म्हणून खेळत आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार रिषभ पंत बाद झाल्यानंतरही राहुल एका मजबूत भिंतीसारखा मैदानावर उभा राहिला. राहुलने शतक झळकावण्यासाठी 202 चेंडूंचा सामना केला. भारताच्या दुसऱ्या डावात राहुलने 247 चेंडूंमध्ये 137 धावांची खेळी दमदार खेळी केली. दरम्यान त्याने 18 चौकार मारले.
इंग्लंडच्या मैदानावर शतक झळकावून केएल राहुलने मोठा पराक्रम केला. कसोटीत इंग्लंडच्या मैदानावर हे त्याचे तिसरे शतक होते. यादरम्यान तो कसोटीमध्ये इंग्लंडच्या मैदानावर 3 शतके झळकावणारा पहिलाच भारतीय सलामीवीर ठरला आहे. (First Indian opener to score 3 centuries on an English field)
???? HISTORY BY KL RAHUL ????
— Johns. (@CricCrazyJohns) June 23, 2025
– KL Rahul is the first Indian opener to score 3 Hundreds in England in Test cricket. pic.twitter.com/0pCxRfv0Gl






