भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल लवकरच संघात परतण्याची शक्यता आहे. राहुल आपल्या दुखापतीतून सावरत आहे आणि आणि येत्या काळात लवकरच पुन्हा मैदानात दिसू शकतो. बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत राहुल दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. अशात सप्टेंबर महिन्यात आशिया चषक खेळण्यासाठी तो पूर्णपणे फिट होईल, असेही बोलले जात आहे.
इंडियन प्रीमयिर लीग 2023 (IPL 2023) मध्ये केएल राहुल (KL Rahul) आपल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व करत होता. जवळपास अर्धा हंगाम त्याने संघाचे नेतृत्व केले. पण नंतर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला. याच दुखापतीमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील त्याला खेळता आले नाही. राहुलच्या अनुपस्थितीत लखनऊ सुपर जायंट्स आणि भारतीय संघाला मोठी किंमत मोजावी लागली. पण काहीच दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये च्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आणि खूपच झपाट्याने बरा होत आहे. अशात संघाला जास्त दिवस त्याची कमी जावणार नाहीये.
माध्यमांतील वृत्तांनुसार केएल राहुल सप्टेंबर महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आशिया चषकाआधी आपली फिटनेस पुन्हा मिळवेल. अशिया चषकासाठी राहुल जर उपस्थित असेल, तर आगामी वनडे विश्चषकातही भारतीय संघाला कोणती चिंता करण्याची बाब नाही. कारण राहुल वनडे विश्चषकातही रोहित शर्मा याच्या साथीने सलामीवीराची भूमिका पार पाडू शकतो.
राहुलच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने 47 कसोटी, 54 वनडे आणि 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी खूपच जबरदस्त राहिली आहे. कारकिर्दीतील 54 वनडे सामन्यात त्याने 45.16च्या सरासरीने 1986 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 5 शतक आणि 13 अर्धशतकांची नोंद आहे. असे असले तरी, मागच्या जवळपास पाच-सहा महिन्यांपासून राहुलचा फॉर्म अपेक्षित राहिला नाहीये. अशात पुनरागमनानंतर त्याचे प्रदर्शन कसे राहणार, हेदखील महत्वाचे ठरेल. (KL Rahul has joined the NCA and is expected to return to the team before the Asia Cup)
महत्वाच्या बातम्या –
कुस्ती महासंघाच्या निवडणूकीची घोषणा! ‘या’ तारखेला पार पडणार मतदार आणि निकाल
ASHES 2023 । नेथन लायन बनणार ‘एलिट’ क्लबचा मेंबर! करणार मोठा विक्रम