---Advertisement---

नाबाद ९५ धावा करुनही केएल राहुलच्या नावावर झाला नकोसा असा विक्रम!

On: बुधवार, मे 9, 2018 12:25 PM
---Advertisement---

जयपुर | काल किंग्ज ११ पंजाब आणि राजस्थान राॅयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानने पंजाबचा १५ धावांनी पराभव केला.

या सामन्यात केएल राहुलने नाबाद ९५ धावांची खेळी केली. परंतु त्याची ही खेळी संघाला विजयी करु शकली नाही.

दोन दिवसांपुर्वीच झालेल्या सामन्यात त्यानेच राजस्थान राॅयल्सविरुद्ध ८४धावांची खेळी करत संघाला विजय मिळवुन दिला होता.

Read-भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या खेळाडूच्या आई-वडीलांचा अपघात

धावांचा अयशस्वी पाठलाग करताना सलामीवीराने केलेल्या नाबाद ९५ या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. यापुर्वी नमन ओझाने २०१० ला चेन्नईविरुद्ध नाबाद ९४ धावा केल्या होत्या तर याच मोसमात विराट कोहलीने मुंबईविरुद्ध नाबाद ९२ धावा केल्या होत्या. या सर्व सामन्यात या खेळाडूंचा संघ पराभुत झाला आहे.

राहुलने या सामन्यात संघाच्या धावांपैकी ६६.४% धावा केल्या. त्याने १४३ पैकी ९५ धावा एकट्याने केल्या. आयपीएलमधील संघाच्या एकूण धावांत खेळाडूने केलेल्या या चौथ्या सर्वोत्तम धावा आहेत.

Read-एकाच वेळी विराट दोन सामने कसे खेळणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment