बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ तयारीला लागले आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलबाबत मोठी बातमी समोर येत आहे. केएल राहुलला शुक्रवारी सकाळी पर्थमधील डब्ल्यूएसीए येथे सामन्याच्या सिम्युलेशन सत्रादरम्यान दुखापत झाली आहे.
केएल राहुलने यशस्वी जयस्वाल सोबत सलामी फलंदाजीची सुरुवात केली. कारण भारताने कर्णधार रोहित शर्माच्या जागी आपली संभाव्य योजना आखली आहे. जो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता आहे.
पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलच्या उजव्या हाताला/कोपराला शॉर्ट डिलीव्हरीवर मार लागला. फिजिओच्या काही मदतीनंतर त्याने फलंदाजी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण तरी राहुलने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला.
KL Rahul’s not looking very comfortable after being struck on his right elbow/forearm off a rising delivery. Tried to resume batting by shaking it off but clearly couldn’t. And now leaving with the physio #AusvInd pic.twitter.com/JFivRNx7af
— Bharat Sundaresan (@beastieboy07) November 15, 2024
भारताचा 3-0 असा पराभव होण्यापूर्वी बंगळुरूमधील पहिल्या कसोटीनंतर राहुलला वगळण्यात आले. त्यानंतर मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध नुकत्याच झालेल्या दुसऱ्या अनौपचारिक सामन्यासाठी त्याची भारत अ संघात निवड करण्यात आली होती. ज्यामध्ये त्याच्याकडून समाधानकारक कामगिरी पाहायला मिळाली नाही.
केएल राहुलच्या दुखापतीबाबत त्याने किंवा बीसीसीआने अद्याप कोणतीही माहिती दिली नसली तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये मोठा खुलासा झाला आहे. आता अश्या स्थितीत सरफराज खान नंतर केएल राहुलला दुखपत झाल्याने भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे.
हेही वाचा-
“प्रत्येक विकेट तुम्हाला समर्पित…”, पुनरागमनानंतर मोहम्मद शमी भावूक, पहिली प्रतिक्रिया समोर
सेहवाग-रोहितपेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा, हा कसोटी सामना शेवटचा
आनंदाची बातमी! मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो, फक्त हे निकष पूर्ण करावे लागतील