---Advertisement---

केएल राहुल ५व्या क्रमांकावर एकदम फिट, फक्त एका गोष्टीची आहे कमी

---Advertisement---

बीसीसीआयच्या समालोचक पॅनेलमधून काढण्यात आलेले भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी केएल राहुलबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

मांजरेकर (Mahesh Manjrekar) यावेळी म्हणाले की, राहुल (KL Rahul) हा वनडे सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजी क्रमवारीत ५ व्या क्रमांकासाठी उत्कृष्ट आहे. परंतु त्यांनी असाही सल्ला दिला की, भारतीय संघ व्यवस्थापनाने सुरेश रैना (Suresh Raina) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) यांसारखे फलंदाज शोधले पाहिजेत.

यावर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या देशांतर्गत वनडे सामन्यात राहुलने मधल्या फळीत फलंदाजी केली होती.

त्यानंतर राहुलने न्यूझीलंड दौऱ्यात वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. कर्नाटकचा राहुल वनडे आणि टी२०मध्ये यष्टीरक्षणही करत आहे.

भारतासाठी आतापर्यंत ३७ कसोटी आणि ७४ वनडे सामने खेळणाऱ्या मांजरेकरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

यावेळी मांजरेकरांना विचारण्यात आले होते की, भारतीय संघ वनडे सामन्यांमध्ये राहुलला ५व्या क्रमांकावर फलंदाजी करू देईल की ते राहुल व्यतिरिक्त इतर फलंदाजाला ५व्या क्रमांकावर पाहत आहेत?

यावर प्रत्युत्तर देत मांजरेकर म्हणाले की, “सध्या तो योग्य आहे, परंतु रैना आणि युवराजसारख्या फलंदाजांचा शोध आपण सुरु ठेवला पाहिजे. यानंतर राहुलला अव्वल क्रमांकावर खेळावे लागेल.”

यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषक होणार आहे. यामध्ये भारतीय संघात ४थ्या क्रमांकावरील फलंदाज आणि अष्टपैलू क्रिकेटपटूबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मांजरेकर म्हणाले की, श्रेयस अय्यर ४थ्या क्रमांकावर आणि हार्दिक पंड्या हा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून योग्य पर्याय आहे.

त्याचबरोबर रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या खराब कामगिरीबद्दल विचारले असता मांजरेकर म्हणाले की, “नेतृत्वाच्या कमतरतेमुळे संघाला या ट्रॉफीत पराभव स्विकारावा लागला.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-दुसऱ्यांदा बाप झालेल्या रैनाला थेट पाकिस्तानवरुन शुभेच्छा

-मंबई किनारी पाहिला डाॅल्फिन मासा, रोहित केले त्याचे खास स्वागत

-शमीला चाहते सध्या गद्दार का म्हणताय? काय आहे कारण?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---