आगमाी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तान करत आहे. या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू भारतीय संघ आणि त्यातील स्टार खेळाडूंचे कौतुक आणि टीका करत असून, त्यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेटचे वातावरण तापत आहे. दिग्गज पाकिस्तानी खेळाडूंनी विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या भारतीय क्रिकेट स्टार्सचे खुलेपणाने कौतुक केले आहे आणि त्यांना पाकिस्तानमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वसीम अक्रम आणि शोएब मलिक एकत्र केएल राहुलचे कौतुक करताना दिसत आहेत.
भारतीय क्रिकेटपटूंचे पाकिस्तानमध्येही मोठे चाहते आहेत. अलीकडेच एका क्रिकेट टीव्ही शोमध्ये पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम आणि शोएब मलिक यांनी विशेषत: भारतीय विकेटकीपर फलंदाज केएल राहुलचे कौतुक केले. वसीम अक्रम म्हणाला- “केएल राहुल सध्या जगातील कोणत्याही फॉरमॅटमधील सर्वोत्तम मधल्या फळीतील फलंदाज आहे.”
Wasim Akram , Sohaib Malik said ” KL Rahul is one of the Best Middle order batsman in the World right now in any format. he’s is bigger than H Klassen and any other but some lockdown kids and shameless BCCI don’t know and ruined his career through politics.#KLRahul #ViratKohli pic.twitter.com/sPSBcH4yxg
— Nitesh Sharma (@im_nitesh26) August 11, 2024
शोएब मलिक देखील या शो मध्ये दाखल झाल होता. तो म्हणाला की, केएल राहुल हेनरिक क्लासेन किंवा इतर कोणत्याही मोठ्या खेळाडूपेक्षा चांगला फलंदाज आहे. तो म्हणाला- “जर तुम्ही केएल राहुलची तुलना पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या इतर खेळाडूंशी केली, तर भारताकडे सध्या जगातील सर्वोत्तम मधल्या फळीतील फलंदाज आहे, जो कोणत्याही परिस्थितीत संघासाठी मोक्याच्या वेळी चमकदार कामगिरी करू शकतो.”
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू केएल राहुलचे कौतुक करतानाच्या या व्हिडिओने क्रिकेटप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. या विधानानंतर दोन्ही देशांच्या क्रिकेटप्रेमींना आणखी एका चुरशीच्या सामन्याची अपेक्षा आहे. आता बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय खेळाडूंना पाकिस्तानात पाठवण्याची सहमती देते की नाही हे मनोरंजक राहील.
हेही वाचा-
श्रीलंकेची दुहेरी चाल; प्रतिस्पर्धांच्या संघातील खेळाडूलाचं बनवलं फलंदाजी प्रशिक्षक
कसोटी मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का, कर्णधार गंभीर जखमी
भारत वि. बांगलादेश सामन्याचे ठिकाण बदलले, ‘या’ स्टेडियममध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय मॅच होणार