बुधवारी (2 सप्टेंबर) आशिया चषकात भारत-पाकिस्तान या संघात सामना खेळला गेला. भारतीय संघाची फंलदाजी संपल्यानंतर पाऊस सुरू झाला. जवळपास 2 तास सुरू राहिलेल्या या पाऊसामुळे हा सामना रद्द झाला. परंतु, या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फंलदाज ईशान किशनने सर्वांचे मन जिंकले. केएल राहुलच्या गैरहजेरीत ईशानला संघात खेळण्याची संधी मिळाली त्याने या संधीच सोने करून दाखवले. असे असले तरी पुढील महिन्यात होणाऱ्या वनडे विश्वचषकात तो खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे.
या अतिमहत्त्वाच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कठीण परिस्थितीत असताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ईशान किशन (Ishan Kishan) ने 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली. भारतीय संघाचा डाव सावरताना त्याने हार्दिक पंड्या याच्यासोबत पाचव्या गडासाठी 138 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
किशन याने या सामन्यात शानदार खेळ दाखवला असला तरी आगामी वनडे विश्वचषक स्पर्धेत तो भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक फलंदाज नसेल. एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाची संघ निवड पाच सप्टेंबर रोजी होईल. यामध्ये राहुल याचा भारतीय संघात समावेश असेल. तसेच ईशान किशन हा देखील संघाचा भाग असणार आहे. त्याचवेळी संजू सॅमसन याला आपली जागा बनवण्यात अपयश आल्याचे देखील सांगण्यात आले.
राहुल व ईशान यांचा संघात समावेश असताना राहुल हा भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल. त्यामुळे सातत्याने चांगले कामगिरी करत असताना तसेच मागील चार सामन्यात अर्धशतके ठोकलेली असताना, ईशान्येला बाकावर बसून राहावे लागेल.
(KL Rahul Is Indias First Choice Opener Ishan Kishan Might On Benched)
महत्वाच्या बातम्या-
“भारतीय संघ 170 धावांवर सर्वबाद झाला असता”, शोएब अख्तरचे मोठे वक्तव्य
इरफानने उडवली पाकिस्तानची खिल्ली, PAK चाहत्यांना येईल राग, तर भारतीय क्रिकेटप्रेमी होतील खुश; लगेच वाचा