---Advertisement---

कोणत्याच यष्टीरक्षकाला जमले नाही ते केएल राहुलने केले

On: रविवार, जानेवारी 26, 2020 7:13 PM
---Advertisement---

ऑकलँड। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज इडन गार्डनवर झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने नाबाद अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

राहुलने या सामन्यात 50 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकरांसह नाबाद 57 धावा केल्या. राहुलचे हे न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेतील दुसरे अर्धशतक आहे. त्याने शुक्रवारी(24 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 56 धावांची खेळी केली होती.

विशेष म्हणजे राहुलने या दोन्ही सामन्यात भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळली. त्याने शुक्रवारी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये यष्टीरक्षण केले होते. त्यामुळे आजचा त्याचा यष्टीरक्षक म्हणून केवळ दुसराच टी20 सामना होता. त्यामुळे यष्टीरक्षक म्हणून पहिल्या 2 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात खेळताना अर्धशतके करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. 

आजच्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 132 धावा केल्या होत्या आणि भारताला विजयासाठी 133 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 17.3 षटकात 135 धावा करत सहज पार केले. राहुलला श्रेयस अय्यरने चांगली साथ दिली. अय्यरने 44 धावांची खेळी केली. तसेच राहुल आणि अय्यरने 86 धावांची तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---