लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (०१ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२मधील ४५वा सामना झाला. या सामन्यात पुन्हा एकदा लखनऊकडून केएल राहुल याने कर्णधार खेळी केली. त्याने सलामीला फलंदाजीला येत खणखणीत अर्धशतक झळकावले. या खेळीदरम्यान त्याने काही आकर्षक षटकार मारले आणि नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
राहुलने (KL Rahul) दिल्लीच्या गोलंदाजांवर (DC vs LSG) दडपण आणत त्यांची मनसोक्त धुलाई केली. ३५ चेंडूंमध्येच त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. दरम्यान दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर कुलदीप यादवला षटकार (KL Rahul Six) मारत त्याने आपल्या आयपीएलमधील १५० षटकारांचा आकडा (150 IPL Sixes) गाठला आहे. भारताकडून सर्वात कमी डाव खेळताना त्याने हा विक्रम आपल्या नावावर (Quickest Indian To Make 150 IPL Sixes) केला आहे.
याबाबतीत राहुलने संजू सॅमसन, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे. राहुलने केवळ ९५ डावांमध्ये आपल्या १५० षटकारांचा पल्ला ओलांडला आहे. राजस्थानचा विद्यमान कर्णधार संजूला हा पराक्रम करण्यासाठी १२५ डाव लागले होते. तर रैनाने १२८, रोहितने १२९ आणि विराटने १३२ डावांमध्ये १५० षटकार पूर्ण केले होते.
भारताकडून आयपीएलमध्ये सर्वात जलद १५० षटकार (डावांनुसार):
९५ डाव – केएल राहुल*
१२५ डाव – संजू सॅमसन
१२८ डाव – सुरेश रैना
१२९ डाव – रोहित शर्मा
१३२ डाव – विराट कोहली
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच एकूण आकडेवारीवर नजर टाकायची झाल्यास, राहुल हा आयपीएलमध्ये सर्वात जलद षटकारांचे दीडशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने डेविड वॉर्नर आणि एबी डिविलियर्स या परदेशी धुरंधराना मागे सोडले आहे. वॉर्नरला त्याचे आयपीएलमधील १५० षटकार पूर्ण करण्यासाठी १०९ डाव खेळावे लागले होते. तर डिविलियर्सने १११ डावांमध्ये हा पराक्रम केला होता.
असे असले तरीही, ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल हे विस्फोटक फलंदाज मात्र राहुलच्या पुढे आहेत. गेलने केवळ ५० डावांमध्ये आपले १५० षटकार पूर्ण केले होते. तर रसेलने त्यासाठी ७२ डाव घेतले होते.
आयपीएलमध्ये सर्वात जलद १५० षटकार (डावांनुसार)-
५० डाव- ख्रिस गेल
७२ डाव- आंद्रे रसेल
९५ डाव- केएल राहुल*
१०९ डाव- डेविड वॉर्नर
१११ डाव- एबी डिव्हिलियर्स
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL | सलग ५ पराभवाने खचला ‘हा’ दिग्गज; म्हणाला, ‘संघात सतत बदल का करताय?’
विराटला हरवताच हार्दिक पांड्याची मोठी प्रतिक्रिया, “इथे ज्युनियर सिनियर काही नसतं”
केविन पीटरसनने निवडले आयपीएल २०२२ विजेतेपदाचे ३ प्रबळ दावेदार, हार्दिकच्या संघाचाही समावेश