Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘गावसकर, कपिल देव यांच्यानंतर आता पुढचा लिजेंड तोच’, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गायले राहुलचे गुणगान

'गावसकर, कपिल देव यांच्यानंतर आता पुढचा लिजेंड तोच', सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गायले राहुलचे गुणगान

April 30, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
KL-Rahul

Photo Courtesy: Twitter/BCCI


मुंबई। तसं पाहता सगळेच क्रिकेटपटू रोज नवनवे रेकॉर्ड्स बनवत बातम्यांमध्ये झळकतात. मात्र एक-दोनच असे असतात, जे आपल्या खेळाच्या माध्यमातून दिग्गजांना प्रभावित करतात, सोबतच त्यांच्यात महान खेळाडू बनण्याचीही क्षमता असते. आता केएल राहुलच्या रुपात भारतालाही एक असा खेळाडू मिळाला आहे, ज्याच्यत लिजेंड बनण्याच्या क्षमता दिसत आहेत. अनेक उतार-चढावांचा सामना केलेल्या राहुलचा खेळ सतत अधिकाधिक उत्कृष्ट होतो आहे. कर्णधाराच्या रुपातही तो आदर्श असल्याचे सिद्ध होते आहे.

या विजयानंतर त्याने मैदानावरचे काही क्षण शेअर केले. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले, पुढे (संघर्ष सुरू राहील). केएल राहुलने स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू ऐपवर इंग्रजी आणि हिंदीत पोस्ट करत या मॅचचे दोन फोटो शेअर केले. पहिल्यांदा फॉरवर्ड लिहिले, आणि त्यापुढे धनुष्यात लावलेल्या बाणाचा इमोजी टाकला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

Koo App

Forward 🏹

View attached media content

– KL Rahul (@rahulkl) 30 Apr 2022 

राहुलच्या या पोस्टवर कमेंट करत अनामिका नावाच्या एका यूजरने आपल्या ‘कू’ रिप्लायमध्ये लिहिले, “गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, धोनी, कोहली आणि मग राहुल… खेळातले लिजेंड्स.”

Koo App

Gavaskar,Kapil Dev, Sachin Tendulkar,Dhoni , Kohli and then Rahul… Legends of the गेम

– Anamika (@Ana10) 30 Apr 2022 

विवेक सिंग नावाच्या यूजरने केएल राहुलच्या या कू पोस्टच्या उत्तरात लिहिले, “बंदी घातली जाण्यापासून ते मुख्य खेळाडू होण्यापर्यंत… तुम्ही एक मोठा पल्ला गाठला आहे… असेच पुढे जात रहा…”

Koo App

From being banned to becoming a key performer … You have come a long way champ …. Keep going

– Vivek Singh 🇮🇳 (@vivek0505) 30 Apr 2022 

अश्वथ राव नावाच्या एका यूजरने राहुलच्या पोस्टखाली लिहिले, “लिजेंड बनण्याच्या मार्गावर… महान खेळाडू… शानदार प्रयत्न.”

Koo App

On way to becoming a LEGEND ❤️ Great Thinker ❤️ Great effort 💐💐

– ಅಶ್ವತ್ಥ್ ರಾವ್ (@AshwathRao333) 30 Apr 2022 

केएल राहुलच्या कर्णधारपदासह लखनऊ सुपर जाएंट्स टीमने शुक्रवारी पंजाब किंग्सच्या विरुद्ध खेळल्या गेलेल्या आईपीएल 2022च्या सामन्याच्या तुलनेत 20 धावा अधिक काढत मोठा विजय नोंदवला आणि या हंगामाचा सहावा सामना जिंकला. मात्र, राहुलने विजयानंतर आपल्या संघावर टीका केली. त्याने फलंदाजांनी त्याला निराश केल्याचे सांगत विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले.

Koo App

🔋❤️🔥

View attached media content

– KL Rahul (@rahulkl) 2 Apr 2022 

केएल राहुलची स्तुती करत टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू लिटल मास्टर सुनील गावस्कर म्हणाले की, “आयपीएलमध्ये लखनऊ टीमच्या कर्णधाराने आपल्या खेळातून हे सिद्ध केले आहे, की वेगात धावा काढण्यासाठी तुम्हाला नव्या प्रकारचे शॉट शोधून काढण्याची गरज नाही. राहुलने निवडलेले सर्वच शॉट्स उत्कृष्ट होते. तो सुंदर खेळतो आहे. त्यांनी पुढे म्हणले की, केएल राहुलच्या फलंदाजीत सर्वात चांगली गोष्ट हीच आहे, की त्याच्या शैलीत काहीच बनावट नाही. तो जो कुठला शॉट खेळतो तो क्रिकेटचा नैसर्गिक शॉट असतो.”

Koo App

30🤎

View attached media content

– KL Rahul (@rahulkl) 18 Apr 2022 

आयपीएलच्या या मोसमात पहिल्यांदा सहभागी झालेला एकदम नवा संघ म्हणजे लखनऊ सुपर जाएंट्स. या संघाने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. सोबतच आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 9 पैकी 6 सामने आपल्या नावावर केले आहेत. राहुल यंदाच्या हंगामातला सर्वाधिक यशस्वी कर्णधार असल्याचा बहुमान आपल्या नावे करू शकतो. आयपीएल 2022 मध्ये त्याने 9 सामन्यांमध्ये 53.43 च्या सरासरीने 374 धावा काढल्या आहेत. यात दोन शतक आणि एका अर्धशतकाचा सहभाग असतो. यासाठी त्याने या हंगामात 34 चौकार आणि 15 षटकार लगावले. या हंगामाच्या टॉप स्कोररर्सच्या यादीत राहुल हा जोस बटलरच्या नंतर दूसऱ्या क्रमांकावर आहे.

Koo App

💯

View attached media content

– KL Rahul (@rahulkl) 17 Apr 2022 

राहुलच्या उत्कृष्ट खेळाबाबत बोलायचं तर तो जगातला असा एकमेव फलंदाज आहे, ज्याने तिन्ही क्रिकेटच्या स्वरुपात, म्हणजे, टेस्ट, वनडे टी20 मध्ये षटकार लावून आपले शतक केले. राहुलने 2014 मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मॅचमध्ये डेब्यू केला होता. यानंतर 2016 मध्ये हरारेमध्ये झिम्बाव्वेच्या विरुद्ध आणि मग याच वर्षी पुन्हा झिम्बाव्वेच्या विरुद्ध T20 मध्येही डेब्यू केला होता.

Koo App

There’s no growth in the comfort zone.

View attached media content

– KL Rahul (@rahulkl) 1 Feb 2022 

एका टेलीविजन शोच्या दरम्यान 11 जानेवारी, 2019ला वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे बीसीसीआयने केएल राहुल आणि हार्दिक पांड्यावर बंदी घातली होती. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या साखळीआधी त्याला घरी पाठवण्यात आले. अर्थात 24 जानेवारी, 2019ला बीसीसीआयने ही बंदी संपवली होती. यावर्षी राहुलने जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले आणि कर्णधार असलेल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. यानंतर सुरू झालेल्या एकदिवसीय सीरिजमध्येही त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी होणार अंतिम सामना

रोहित शर्मा – एक धडाकेबाज ओपनर, एक उत्कृष्ट कर्णधार  

कृणाल पंड्याची मागील ७ महिन्यांतील मेहनत आली फळाला, दमदार गोलंदाजीचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला


ADVERTISEMENT
Next Post
Shahrukh-Khan

'किंग खान' थेट अमेरिकेत बांधणार वर्ल्ड क्लास क्रिकेट स्टेडिअम; एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

Shubman-Gill

स्विगीच्या वाईट सेवेवर संतापला शुबमन गिल; जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्ककडेच केली तक्रार

Virat-Kohli

नशीबच फुटकं! खणखणीत अर्धशतक झळकावूनही विराट का होतोय ट्रोल? जाणून घ्या कारण

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.