Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृणाल पंड्याची मागील ७ महिन्यांतील मेहनत आली फळाला, दमदार गोलंदाजीचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला

कृणाल पंड्याची मागील ७ महिन्यांतील मेहनत आली फळाला, दमदार गोलंदाजीचे श्रेय दिले 'या' व्यक्तीला

April 30, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Krunal-Pandya

Photo Courtesy: iplt20.com


पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२२मधील ४२व्या सामन्यात अष्टपैलू कृणाल पंड्या याने धमाकेदार प्रदर्शन केले. त्याला फलंदाजीत विशेष प्रदर्शन करता आले नाही. परंतु त्याने गोलंदाजीत आपला दम दाखवला. ४ षटके गोलंदाजी करताना केवळ ११ धावा देत त्याने २ विकेट्स काढल्या. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यानंतर कृणालने त्याच्या दमदार गोलंदाजीचे श्रेय एका व्यक्तीला दिले आहे. 

सामनावीर पुरस्कार स्विकारल्यानंतर कृणाल (Krunal Pandya) म्हणाला की, “गेल्या ७-८ महिन्यांमध्ये मी माझ्या गोलंदाजीवर भरपूर काम करत होतो, ज्याचा फायदा मला आता होत आहे. यादरम्यान राहुल सांघवींनी मला भरपूर मदत केली आहे. फलंदाजीत मी खास प्रदर्शन करू शकत नाहीये. अपेक्षा आहे की, पुढे मी फलंदाजीतही चांगले प्रदर्शन करेल.”

राहुल सांघवी (Rahul Sanghvi) हे माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांनी १९९८ ते २००१ दरम्यान भारतीय संघाकडून १ कसोटी आणि १० वनडे सामने खेळले आहेत. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी ९५ प्रथम श्रेणी आणि ६८ अ दर्जाचे सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर २७१ विकेट्स आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ९६ विकेट्स त्यांनी घेतल्या आहेत.

लखनऊच्या कर्णधारानेही केले गोलंदाजांचे कौतुक
या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा खेळपट्टीकडून अधिकचा बाऊन्स मिळत होता, ज्याचा लखनऊच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला आणि पंजाबला १३३ धावांवरच रोखले.

गोलंदाजांच्या प्रदर्शनाचे कौतुक करताना (KL Rahul Praises Bowlers) कर्णधार केएल राहुल म्हणााला की, “भलेही आमच्या फलंदाजांनी निराशा केली. पण गोलंदाजांनी खूप चांगले प्रदर्शन केले. कृणाल पंड्याने या संपूर्ण आयपीएल हंगामात दमदार प्रदर्शन केले आहे. त्याने महत्त्वाच्या क्षणी संघाला विकेट्स मिळवून दिल्या. याशिवाय वेगवान गोलंदाजांनीही ज्या प्रकारे गोलंदाजी केली, त्याचा संघाला फायदा झाला आहे. आम्हाला कोणत्याही सामन्यात परिस्थितीला चांगल्याप्रकारे समजून घेण्याची गरज आहे. आम्हाला माहिती पाहिजे की, आम्हाला कधी काय करायचे आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटच्या तीन प्रकारात शतक करणारा रोहित तीन भारतीयांपैकी एक

‘आमचा हकुना मटाटा बनण्यासाठी धन्यवाद’, रितीकाने रोहितचे अनसीन फोटो शेअर करत केले हटके बर्थडे विश

एकदा नाही, दोनदा नाही तर पाच वेळा हिटमॅनने ‘या’ बलाढ्य संघांना धू धू धुतले


ADVERTISEMENT
Next Post
Photo Courtesy: Twitter/@ICC

अशी २ कारणे, ज्यामुळे रोहित शर्मा अन् विराट कोहलीची तुलना तर होणारचं

Jharkhand-Team

रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी होणार अंतिम सामना

Photo Courtesy: Twitter/IPL/ICC/BCCI

रोहित शर्मा - एक धडाकेबाज ओपनर, एक उत्कृष्ट कर्णधार  

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.