---Advertisement---

‘आमचा हकुना मटाटा बनण्यासाठी धन्यवाद’, रितीकाने रोहितचे अनसीन फोटो शेअर करत केले हटके बर्थडे विश

On: शनिवार, एप्रिल 30, 2022 3:02 PM
Rohit-Sharma-and-Ritika-Sajdeh
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज (३० एप्रिल) आज आपला ३५वा वाढदिवस (Rohit Sharma Birthday) साजरा करत आहे. या खास दिनी रोहितवर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रोहितची पत्नी रितीका सजदेह हिनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितीकाने इंस्टाग्रामवर रोहितचे काही न पाहिलेले फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या (Ritika Wished Rohit) आहेत. या फोटोमध्ये रोहित त्याची मुलगी समायरासोबत मस्ती करतानाही दिसत आहे.

रितीकाने (Ritika Sajdeh) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये रोहितचे (Rohit Sharma) वेगवेगळे ५ फोटो जोडले आहे. या फोटोंमध्ये तो रितीका आणि समायरासोबत मस्ती करताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा रो, मी आणि सॅमी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आमचा हकुना मटाटा बनण्यासाठी तूझे खूप खूप आभार.’

तसेच तिने या कॅप्शनमध्ये हृदयाचा इमोजीही जोडला आहे. रितीकाच्या या पोस्टवर चाहतेही त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/p/Cc8nRn6I8Lu/?utm_source=ig_web_copy_link

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---