आयपीएलचा 17 वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्या सामन्याने हंगामाचा नारळ फुटणार आहे. मात्र त्याआधी सरफराज खान आणि मुशीर खान यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तर मुशीर खान आणि सरफराज खान यांनी भारताकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांना त्याचे फळ मिळाले आहे.
याबरोबरच, सरफराजने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बॅटने फटकेबाजी केली, तर मुशीर खानने अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळताना शानदार खेळ केला होता. तसेच एक महिन्यापूर्वी महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी वडील नौशाद खान यांना ‘थार’ कार गिफ्ट करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता आनंद महिंद्रा यांनी ती घोषणा खरी ठरवली आहे.
अशातच आज म्हणजेच आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवशीच आनंद महिंद्रा यांनी सरफराज खान आणि मुशीर खान यांना ‘थार’ भेट दिली आहे. यामुळे दोन्ही खेळाडूंच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे. याबाबत सरफराज खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्याचा व्हिडिओ आणि फोटोही शेअर केला आहे. यामध्ये सरफराज खान, त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान आणि वडील नौशाद खान हे तिघेही उपस्थित असल्याचे दिसत आहे.
https://twitter.com/Delhiite_/status/1771131938742423587
दरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवल्यानंतर मुंबईचा फलंदाज सर्फराज खान टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करण्यात यशस्वी ठरला आहे. पदार्पणाच्या कसोटीतच सर्फराजने दोन्ही डावात अर्धशतके झळकावून चमकदार कामगिरी केली. अशा परिस्थितीत इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील अनेक संघ त्याच्या हात धुवून मागं लागले आहेत. विशेष म्हणजे तो आयपीएल 2024 च्या लिलावात 20 लाख बेस प्राईस असूनही अनसोल्ड राहिला होता.
त्याआधी मुशीर खान याने विदर्भ विरुद्ध रणजी ट्रॉफी फायनल्या दुसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावलं होतं. मुशीरने 132 बॉलमध्ये 38.6 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. मुशीरच्या या अर्धशतकी खेळीत 3 चौकारांचा समावेश होता. मुशीरच्या अर्धशतकानंतर त्याचे वडील नौशाद खान यांनी त्याचं अभिनंदन केलं. मुशीरने याआधी क्वार्टर फायनमध्ये बडोदा विरुद्ध द्विशतकी खेळी केली होती. मुशीरने 203 धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर मुशीरने सेमी फायनलमध्ये तामिळनाडू विरुद्ध 55 धावांची खेळी केली. मुशीरने या खेळीसह आपली छाप सोडली होती.
महत्त्वाच्या बातम्या-