IPL | सलग ५ पराभवाने खचला ‘हा’ दिग्गज; म्हणाला, ‘संघात सतत बदल का करताय?’

IPL | सलग ५ पराभवाने खचला 'हा' दिग्गज; म्हणाला, 'संघात सतत बदल का करताय?'

इंडियन प्रीमिर लीग २०२२मध्ये ४१व्या सामन्यात गुरुवारी (दि. २८ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने होते. या सामन्यात दिल्लीने कोलकाताला ४ विकेट्सने पराभूत केले. हा कोलकाताचा हंगामातील सलग ५वा पराभव होता. कोलकाताने हंगामात खेळलेल्या ९ सामन्यांपैकी फक्त ३ सामने जिंकले आहेत, तर उर्वरित ६ सामन्यांवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे. अशात संघातील परदेशी वेगवान गोलंदाज निराश आहे. त्याने संघात सतत केलेल्या बदलांवर निशाणा साधत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम साऊदी (Tim Southee) आहे. साऊदी म्हणाला की, इंडियन प्रीमिअर लीगसारख्या (Indian Premier League) स्पर्धेत संघाने सातत्याने बदल करणे योग्य नाही. मात्र, अनेकदा ही आवश्यकता असते, जेव्हा संघ सतत जिंकत नसतो.

साऊदी म्हणाला की, “आम्ही सुरुवातीच्या काही रणनीतीचा प्रयत्न केला आहे. तसेच, आयपीएलमध्ये कोणीही खराब खेळाडू नाहीये. ते सर्व चांगले खेळाडू आहेत. ज्यांनी सलामीला फलंदाजी केलीये, त्यांच्याकडेही प्रतिभा आहे. त्यामुळे फक्त आऊट ऑफ फॉर्मचा विषय आहे. नाहीतर संघ आव्हानासाठी तयार आहे. संघात वारंवार बदल करणे योग्य नाहीये. मात्र, असे तेव्हाच होते, जेव्हा तुम्ही अनेक सामन्यात विजय मिळवत नसता.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाताने यंदाच्या हंगामात दमदार सुरुवात केल्यानंतर त्यांना सलग ५ पराभवांचा सामना करावा लागला आहे. फक्त ६ गुणांसह ते गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर विराजमान आहेत. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे.

कोलकातासारख्या तगड्या संघाने आपल्या फलंदाजी फळीत सुरुवातीच्या सामन्यांप्रमाणे रणनीती वापरली होती. मात्र, त्यांना यश मिळू शकले नाही. त्यांची सातत्याने घसरगुंडी होत आहे. साऊदीने सोमवारी (दि. ०२ मे) वानखेडे येथे होणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आणखी एका महत्त्वाच्या सामन्यापूर्वी म्हणले आहे की, त्यांच्या संघाचे ध्येय हे आगामी सामने जिंकत पुढे जाणे आहे. त्यांना २८ एप्रिलला झालेल्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात फक्त १४६ धावांचे कमकुवत आव्हान दिल्यामुळे सामना गमवावा लागला होता. यामध्ये कोलकाताने ३५ धावांवर ४ विकेट्स गमावले होते. त्यानंतर नितीश राणाच्या अर्धशतकामुळे कोलकाताला ९ विकेट्स गमावत १४६ धावांपर्यंत पोहोचता आले होते.

साऊदीने या हंगामात ४ सामन्यात गोलंदाजी करताना ६.९४च्या इकॉनॉमी रेटने ८ विकेट्स घेतल्या आहेत. यात २० धावा देत ३ विकेट्स घेणे ही त्याची हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

केविन पीटरसनने निवडले आयपीएल २०२२ विजेतेपदाचे ३ प्रबळ दावेदार, हार्दिकच्या संघाचाही समावेश

IPL| पुढील वर्षी धोनीची जागा घेत ‘हे’ ३ खेळाडू बनू शकतात चेन्नईचे भविष्यातील कर्णधार

झेलबाद झाला गिल, परंतु डीआरएसमध्ये निघाला नो बॉल; नाट्यमय प्रसंगामुळे पंचांवर चिडला विराट

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.