fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमध्ये विक्रम अनेक झाले, परंतू नकोसा विक्रम मात्र आजही पुण्याच्या नावावर

September 20, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Facebook/ ICCPune Warriors India - Official

Photo Courtesy: Facebook/ ICCPune Warriors India - Official


आयपीएल २०२०मध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध जिंकत स्पर्धेचे अभियान विजयाने सुरु केले. स्पर्धेतील दुसरा सामना दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब संघात होत आहे.

या महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली डेअरडेविल्स संघाचे नेतृत्त्व श्रेयस अय्यर करत आहे तर किंग्ज ११ पंजाबचे नेतृत्त्व केएल राहुल करत आहे. केएल राहुल हा पंजाबचे नेतृत्त्व करणारा १२वा खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये केवळ पंजाब संघाचेच १२ कर्णधार झाले आहेत. त्याखालोखाल दिल्लीचे ११ तर मुंबईचे ७ कर्णधार झाले आहेत.

आजपर्यंत आयपीएलमध्ये केएल राहुलसह ५० खेळाडूंनी एकदातरी संघाचे नेतृत्त्व केले आहे. केएल राहुल हा आयपीएलमध्ये नेतृत्त्व करणारा २४वा भारतीय कर्णधार ठरला आहे. तर तब्बल २६ परदेशी खेळाडूंनी आयपीएलमध्ये कर्णधारपद भुषविले आहे.

सर्वात कमी अर्थात केवळ दोन कर्णधार चेन्नई सुपर किंग्ज, कोची टस्कर केरला व गुजरात लायन्स या संघाचे झाले आहेत. यातील चेन्नई संघाने तब्बल १२ हंगामात भाग घेऊनही केवळ २ कर्णधार पाहिले आहे. एमएस धोनी व त्याच्या अनुपस्थितीत काही सामन्यात रैनाने नेतृत्त्व केले आहे.

गमतीचा भाग म्हणजे तब्बल १२ हंगाम खेळलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधारांवर सर्वाधिक विश्वास दाखवलेला दिसतो. या संघाचे १२ हंगामात केवळ ४ कर्णधार झाले आहेत तर पुणे वॉरियर्स इंडिया संघाचे केवळ ३ हंगामात तब्बल ६ कर्णधार झाले होते. एवढंच नाही तर पुण्याचाच दुसरा संघ रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचेही केवळ दोन हंगामात ३० सामन्यात ३ कर्णधार झाले.

पुणे वॉरियर्स इंडिया संघाचे २०११ ते २०१३ या काळात सौरव गांगुली, युवराज सिंग, ऍरॉन फिंच, ऍंजेलो मेथ्थूज, स्टिवन स्मिथ व रॉस टेलर असे ६ कर्णधार झाले होते तर दुसऱ्या बाजूला रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे २०१६ व २०१७ अशा दोन हंगामात अजिंक्य रहाणे, एमएस धोनी व स्टिवन स्मिथ असे तीन कर्णधार झाले.

 


Previous Post

केएल राहुलचा कर्णधार म्हणून पहिला निर्णय क्षेत्ररक्षणाचा, या धुरंदरला केले बाहेर

Next Post

स्वप्नातही कुणी विचार केला नसेल असा खराब विक्रम आहे शमीच्या नावावर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
टॉप बातम्या

“आता भारतासाठी सलामीला फलंदाजी करण्यासही तयार”, वॉशिंग्टन सुंदरने केले प्रतिपादन

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCIDomestic
टॉप बातम्या

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईच्या संघाची निराशाजनक कामगिरी, निवड समिती अध्यक्षांनी ‘हे’ बदल करण्याची केली मागणी

January 25, 2021
Photo Courtesy: Facebook/icc
टॉप बातम्या

“इंग्लंडने आपला सर्वोत्तम ताकदीचा संघ न उतरवणे, हा भारताचा अपमान असेल”

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी दहा वेळा बघितली होती सचिनची ‘ती’ खेळी, अजिंक्य रहाणेने केला उलगडा

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

पाकिस्तान संघाचे भारताच्या पावलावर पाऊल; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तब्बल ‘इतक्या’ नवोदित खेळाडूंना संधी

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

SL vs ENG : रूटच्या झुंजार शतकाने इंग्लंडला तारले, दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत

January 24, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

स्वप्नातही कुणी विचार केला नसेल असा खराब विक्रम आहे शमीच्या नावावर

Photo Courtesy: Twitter/IPL

पहिल्या सामन्यातील 'किंग' समजल्या जाणाऱ्या खेळाडूला पंजाबने दाखवला बाहेरचा रस्ता

इकडे आयपीएल सुरु असताना 'त्याने' तिकडे क्रिकेटमध्येच रचला अनोखा इतिहास

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.