सध्या जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा केएल राहुल टी-20, वन-डे आणि कसोटी क्रिकेट सर्वोत्तम फलंदाज आहे.असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने व्यक्त केले आहे.
तसेच इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ व्यस्थापनाने राहुलला पहिल्या कसोटीसाठी अंतिम 11 खेळाडूंच्या संघात समावेश करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
“मला राहुलची फलंदाजी पहायला आवडते. त्याच्याकडे सर्व प्रकारच्या गोलंदाजावर वर्चस्व गाजवण्यासाठी लागणारे कौशल्य आहे. राहुलकडे टी-20, वन-डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळाव्या लागणाऱ्या फटक्यांची विविधता आहे. त्याने यावर्षीच्या आयपीएलमध्ये केलेली फलंदाजी अप्रतिम होती.” या शब्दात वॉटसनने केएल राहुलचे कौतूक केले.
तसेच पुढे शेन वॉटसनने भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारताकडे विजयाची संधी आहे असे मत व्यक्त केले आहे.
“गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडचा संघ वन-डे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. मात्र त्यांची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी खालावली आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेच्या विजयाचा भारत प्रबळ दावेदार आहे. त्याचबरोबर भारतीय संघात अनुभवी आणि प्रतिभावान खेळाडूंंचा भरणा आहे. जर या कसोटी मालिकेत भारताने विजय मिळवल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.” असे शेन वॉटसन म्हणाला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-पहिल्या सामन्यातच दडलाय भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा निकाल