तब्बल 17 वर्षानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने यजमान संघाचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंडने या दोन्ही कसोटी सामन्यात अतिशय धडाडीचे निर्णय घेत आक्रमक क्रिकेटचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांच्या याच आक्रमक क्रिकेटचे अनेक चाहते देखील निर्माण झाले आहेत. आता त्यांच्या याच प्रकारच्या क्रिकेटने भारतीय क्रिकेट संघाचा काळजीवाहू कर्णधार केएल राहुल प्रभावित झाला आहे.
बेन स्टोक्स याने कसोटी संघाचे कर्णधारपद व ब्रेंडन मॅकलम याने मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर इंग्लंडने अतिशय आक्रमकपणे कसोटी क्रिकेट खेळले आहे. त्यांनी खेळलेल्या 8 पैकी 7 कसोटीत विजय संपादन केला. इंग्लंड संघ विजयासाठी कोणतीही जोखीम घेताना दिसून येतो. त्यांची हीच शैली केएल राहुल याला भावली.
भारतीय क्रिकेट संघ 14 डिसेंबरपासून बांगलादेश विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा जखमी असल्याने या सामन्यात राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल. या कसोटी मालिकेआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल म्हणाला,
“इंग्लंड संघ ज्याप्रकारे क्रिकेट खेळतोय ते पाहणे खरंच रोमांचित करण्यासारखे आहे. तुम्ही ते विचार न करता क्रिकेट खेळतात असे म्हणू शकत नाही. ते अतिशय विचारपूर्वक व नियोजनबद्ध पद्धतीने अशा प्रकरचा खेळ दाखवत आहेत. क्रिकेट खेळण्याची काही पारंपारिक पद्धत नाही. सध्या क्रिकेट बदलताना आपण पाहतोय.”
राहुल पुढे म्हणाला,
“पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी खरंच रोमांचक झाली. हे क्रिकेट पाहायला केव्हाही आवडते.”
भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध अशा प्रकारचे क्रिकेट खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण, भारताचे प्राथमिक लक्ष जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे असेल.
(KL Rahul Likes England BazzBall Cricket Style)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशान किशनमुळे ‘या’ भारतीय फलंदाजाचे नुकसान, वसीम जाफरने व्यक्त केले मत
धोनीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्याने वापरली ‘ही’ अनोखी पद्धत, सुंदर व्हिडिओ होतोय व्हायरल