भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या संघातून बाहेर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुल संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पंरतु वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर आता राहुल टी-२० मालिकेतून देखील माघार घेत असल्याचे समोर येत आहे.
केएल राहुल (KL Rahul) २१ जुलै रोजी कोरोना पॉजिटिव्ह आढळला होता. यानंतर संघात त्याच्या पुनरागमनाविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. २२ जुलैपासून सुरू झालेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळला नाही. आता अशा बातम्या समोर येत आहेत की, वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत देखील राहुल खेळू शकणार नाही. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप याविषयी कसलीही अधिकृत माहिती दिली गेली नाहीये.
बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्यानंतर माध्यमांमध्ये माहिती दिली जात आहे की, “केएल राहुलला कोरोनातून सावरण्यासाठी अजून काही काळाची गरज आहे.” राहुलच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या साथीने रिषभ पंत किंवा इशान किशन डावाची सुरुवात करू शकतात. उभय संघातील टी-२० मालिकेची सुरुवात २९ जुलै रोजी होईल.
माध्यमांतील वृत्तानुसार आज म्हणजेच बुधवारी (२७ जुलै) त्याच्या विलगिकरण कालावधीचा शेवटचा दिवस होता. परंतु बीसीसीआयच्या मेडिकल टीमने राहुलला अजून एक आठवडला विश्रांती गरजेची असल्याचे सांगितले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी राहुल गंभीर दुखापतीला तोंड देऊन परतला आहे. त्याच्या दुखापतीवर जर्मनीत शस्त्रक्रिया केली गेली असून सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करत आहे. परंतु वेस्ट इंडीविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी आलेल्या या बातमीमुळे त्याच्या पुनरागमनासाठी चाहत्यांची प्रतिक्षा लांबणार असल्याचे दिसते.
वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ तब्बल ६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच जिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध राहुल पुनरागमन करू शकला नसला, तरी जिम्बाब्वे दौऱ्यात मात्र तो खेळेल असे सांगितले जात आहे. जिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. राहुलने यापूर्वी त्याचा शेवटचा टी-२० सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानतंर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुल संघाचे नेतृत्व करणार होता, परंतु दुखापतीमुळे त्याने या मालिकेतून माघार घेतली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला
INDvsWI Playing XI: भारताची नजर क्लिन स्वीपवर, आवेशच्या जागी ‘या’ गोलंदाजाला दिली जाऊ शकते संधी
क्षेत्ररक्षणाची व्याख्याच बदलणारा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक; एकाच सामन्यात घेतले होते ५ झेल