---Advertisement---

WTC Final: कसोटीत ५ शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजाला नारळ, चाहत्यांकडून टिकेचा भडिमार

On: बुधवार, जून 16, 2021 11:26 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) तर्फे आयोजित पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जूनपासून साऊथम्प्टनवर खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघ पहिला कसोटी किताब जिंकण्याकरिता न्युझीलंडविरुद्ध दोन हात करेल. या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरु असून नुकताच बीसीसीआयने 15 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर केला आहे.

केएल राहुलला डच्चू-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (15 जून) सोशल मीडियाद्वारे संघाची घोषणा केली. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघात रिषभ पंत आणि रिद्धीमान साहाच्या रुपात संघात 2 यष्टीरक्षक ठेवले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बीसीसीआयने घोषित केलेल्या 15 सदस्यीय चमूत यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला स्थान मिळालेले नाही. यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून संघ व्यवस्थापनावर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

राहुलने भारतीय कसोटी संघाकडून आतापर्यंत 36 सामने खेळले आहेत. दरम्यान 34.58 च्या सरासरीने 2006 धावा चोपल्या आहेत. यात त्याची 5 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. दुर्दैवाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याला केवळ 2 सामने खेळायला मिळाले आहेत. त्यात त्याने 101 धावांची कामगिरी केली आहे.

आपल्या पहिल्यावहिल्या अजिंक्यपद स्पर्धेच्या किताबावर नाव करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असून, न्युझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 ने विजय मिळवून आपला हेतू स्पष्ट केला आहे. परंतु भारतीय संघ व्यवस्थापणाने केएल राहुलला डच्चू दिला त्यामुळे टीकाकारांनी जर राहुलला संधी द्यायची नव्हती तर श्रीलंका दौऱ्यासाठी का पाठवले नाही? हा प्रश्न केला आहे.

विश्वकसोटी स्पर्धा अंतिम सामन्यातील 15 सदस्यीय भारतीय संघ :
विराट कोहली( कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे( उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---