भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक 2022 मध्ये विशेष प्रदर्शन करू शकला नाही. त्यांनी साखळी फेरीतील सलग 2 सामने जिंकले. परंतु सुपर-4 फेरीतील पहिल्या दोन्ही सामन्यात त्यांच्या हाती निराशा आली. अखेर अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा व शेवटचा सामना जिंकत त्यांनी स्पर्धेचा गोड शेवट केला. या स्पर्धेतून भारतीय संघ बऱ्याचशा सकारात्मक गोष्टीही घेऊन गेला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्टार फलंदाज विराट कोहली याला त्याचा फॉर्म गवसला.
विराटने (Virat Kohli) अफगाणिस्तानविरुद्धच्या (INDvsAFG) शेवटच्या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना शतक झळकावले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान शतकाव्यतिरिक्त त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतकेही निघाली. सामन्यानंतर जेव्हा भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) याला विराटकडून आगामी टी20 सामन्यांमध्येही सलामी करून घेण्याचा प्रश्न विचारण्यात (Virat Kohli Opening Slot) आला, त्यावर त्याने लक्षवेधी उत्तर दिले.
तर मी काय संघाबाहेर जाऊ?
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात राहुलकडे भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा होती. रोहित शर्माच्या अनुपस्थित तो संघाचे नेतृत्त्व करत होता. अफगाणिस्तानवर 101 धावांनी विजयी झाल्यानंतर राहुल पत्रकारांना सामोरे गेला. पत्रकार परिषदेत त्याने शतकवीर विराटची तोंडभरून प्रशंसा केली. दरम्यान एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला की, “विराटने सलामीला फलंदाजी करताना शतक केले. यापूर्वीही आपण त्याला आयपीएलमध्ये सलामीला मोठ्या खेळी खेळताना पाहिले आहे. त्याने सलामीला टी20 क्रिकेटमध्ये 5 शतके केली आहेत. तर तुम्हाला काय वाटते, त्याने टी20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही सलामीवीराची भूमिका पार पाडावी का?”
राहुलने पत्रकाराच्या या प्रश्नाचे ताबडतोब उत्तर दिले. त्याने वेळ न घालवता उत्तर देत लिहिले की, “तर मग मी संघातून बाहेर जाऊ का?”
पुढे आपल्या उत्तराचे स्पष्टीकरण देताना राहुल म्हणाला की, “विराट खूप मोठा खेळाडू आहे. असे नाही की, तो फक्त सलामीला फलंदाजी करतानाच चांगले प्रदर्शन करेल. तो भारतीय संघासाठी तिसऱ्या क्रमांकावरही चांगले प्रदर्शन करू शकतो. टी20 विश्वचषकातही तो असेच करेल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंची जागा धोक्यात! आशिया चषकातील कामगिरीचा फटका
उर्वशी रौटेलानंतर आता अजून एक भारतीय अभिनेत्री नसीम शाहवर फिदा, केले आहे खास ट्वीट
आगामी टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा ‘मेंटर’ म्हणून ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची नियुक्ती