भारत आणि इंग्लंड संघात सध्या ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना ४ ऑगस्ट सुरू झाली आहे. या सामन्यात सलामीवीर फलंदाज केएल राहुलने पहिल्या डावात उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. याच उत्कृष्ट प्रदर्शनानंतर केएल राहुल म्हणाला की, २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यातील अपयशातून त्याने शिकले आहे, यामुळे त्याला सध्याच्या दौऱ्यात मदत होत आहे.
राहुलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी तीन दिवसांच्या सराव सामन्यात शतक झळकावले होते. तर आता इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ८४ धावा केल्या. त्याच बरोबर भारताला ९५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत राहुल म्हणाला की, “माझ्या मनात बरेच काही चालू होते. मला असे वाटायचे की कसोटी क्रिकेटमध्ये मी प्रत्येक चेंडूवर दोन किंवा तीन वेगवेगळे शॉट खेळू शकतो, पण मला समजले की त्यांना नियंत्रित करावे लागेल.”
त्याचबरोबर तो पुढे म्हणाला की, “कधीकधी खेळपट्टी ही आव्हानात्मक असते. ज्यामुळे चांगल्या गोलंदाजांना सामोरे जाताना काही शॉट्स खेळणे टाळावे लागतात. कसोटी क्रिकेटमधील माझ्या मागील खराब कामगिरीपासून धडा घेऊन मी सुधारणा केली आहे.”
त्याने इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचे कौतुक करत म्हटले की, “इंग्लंडच्या मैदानावर खेळणे आव्हानात्मक आहे. इंग्लंड संघाकडे उत्तम गोलंदाज आहे. अँडरसन आणि ब्रॉड खूप कुशल गोलंदाज आहेत आणि त्यांनी संघासाठी अनेक वेळा सामने जिंकले आहेत. त्यांच्या विरुद्ध खेळणे सोपे नाही.”
सलामीवीर केएल राहुल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात भारताला ९५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
इंग्लंड संघाने पहिल्या डावात १८३ धावा केल्या. तर भारतीय संघाने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. होत्या. यात केएल राहुलने ८४ धावांचे योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
“माझे नाव पुन्हा जगासमोर आणण्यासाठी श्रीजेशचे आभार”
मोहम्मद सिराज भिडला इंग्लिश खेळाडूंना; सामन्यादरम्यान स्लेजिंग करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
भन्नाट! रिषभ पंतने बुमराहच्या गोलंदाजीवर सिब्लीचा घेतला अप्रतिम झेल, व्हिडिओ व्हायरल






