बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 गडी राखून विजय मिळवला. ढाका येथे झालेल्या या सामन्यात भारताने आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्या महत्वपूर्ण खेळीने थरारक विजय मिळवला. मात्र, या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेला केएल राहुल हा फलंदाजीत पूर्णतः अपयशी ठरला. खराब कामगिरीनंतर आता त्याची स्वतःचीच प्रतिक्रिया आली आहे.
रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यानंतर राहुल याच्याकडे संघाचे नेतृत्व आले. राहुल हा मालिकेतील पहिल्या चट्टोग्राम कसोटीत चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्याने या कसोटीत दोन्ही डावात अनुक्रमे 22 व 23 धावा केल्या होत्या. तर ढाका कसोटीच्या पहिल्या डावात आठ तर दुसऱ्या डावात दोन धावा करू शकलेला. यामुळे त्याने ही मालिका केवळ 57 धावांसह संपवली. त्याचवेळी त्याने अखेरच्या वेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतासाठी कसोटी सामने खेळले होते. त्यावेळी देखील तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. त्यावेळी त्याने 10,12 व 8 धावा केलेल्या.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राहुल आपल्या कामगिरीविषयी बोलताना म्हणाला,
“ज्यावेळी आम्ही सामन्यात उतरतो त्यावेळी मागे काय झाले आहे आणि पुढे काय करायचे याचा विचार करत नाही. आमचे ध्येय केवळ सर्वोत्तम कामगिरी करण्याचे असते. कधी यात यश येते कधी अपयश. एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात येणे देखील काहीसे अवघड असते. मी बराच काळ खेळलेलो नव्हतो. त्यामुळे सूर सापडण्यास वेळ लागतोच. या मालिकेत माझी कामगिरी नक्कीच चांगली नव्हती.”
राहुल हा सातत्याने खराब कामगिरी करत असल्याने त्याच्यावर संघातील जागा टिकवण्याचा दबावा असेल. शुबमन गिल हा देखील चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने त्याला त्याच्याशी संघातील जागेसाठी झुंज द्यावी लागेल.
(KL Rahul Open On His Poor Performance In Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय योगायोग म्हणावा हा! उनाडकटने शेअर केला आपल्या दोन जर्सींचा फोटो, यामध्ये एक खेळाडू आहे कॉमन
‘धोनी भाईशी माझी तुलना होते, तेव्हा मी…’, बांगलादेशचे मैदान मारणाऱ्या ईशान किशनची खास प्रतिक्रिया






