टीम इंडियाचा मर्यादीत षटकांच्या संघाचा यष्टीरक्षक केएल राहुलने आपण युवराजचा विक्रम मोडू शकतो, असे सांगितले आहे. तो ट्विटरवरील प्रश्न उत्तरांच्या तासात एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला.
ट्विटरवरील प्रश्नउत्तरांच्या सेशनमध्ये त्याने एका चाहत्याच्या प्रश्नावर हे उत्तर दिले. राहुल तु टी२०मध्ये १४ चेंडूत अर्धशतक केले आहेस. युवराजच्या १२ चेंडूतील अर्धशतकांचा विक्रम कोण मोडेल असे तुला वाटते?, असा प्रश्न चाहत्याने विचारला होता.
यावर राहुलने आपणच तो खेळाडू असेल, असे म्हटले आहे. “मला वाटते तो खेळाडू मीच असेल,” असे राहुलने उत्तरात त्या चाहत्याला म्हटले आहे.
I think it's got to be me 😜 https://t.co/FtvM9uIOYU
— K L Rahul (@klrahul) May 10, 2020
२१ मार्च २००७ रोजी युवराजने इंग्लंडविरुद्ध खेळताना डर्बन येथे १६ चेंडूत ५८ धावा केल्या होत्या. त्यात त्याच्या १२ चेंडूतील अर्धशतकाचा समावेशही आहे. आजही हे अर्धशतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
केएल राहुने २०१४मध्ये मेलबर्न कसोटीत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. यात भारतीय संघाचे नेतृत्त्व कॅप्टन कूल एमएस धोनी करत होता. तर २०१६मध्ये तो भारतीय मर्यादीत षटकांच्या संघात क्रिकेट खेळू लागला.
केएल राहुल भारताकडून ३६ कसोटी, ३२ वनडे व ४२ टी२० सामने खेळला आहे. त्यात त्याने कसोटीत २००६, वनडेत १२३९ तर टी२०मध्ये १४६१ धावा केल्या आहेत. यातील १० आंतरराष्ट्रीय सामन्यात तो भारतीय संघाचा पुर्णवेळ यष्टीरक्षक होता. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये दोन शतके आहेत.