सध्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात टीम इंडियाच्या यष्टीरक्षणाची मदार सांभाळणाऱ्या केएल राहुलने आपला आवडता फलंदाज म्हणून एबी डिविलियर्सचे नाव घेतले आहे.
ट्विटरवरील प्रश्नउत्तरांच्या सेशनमध्ये त्याने एका चाहत्याच्या प्रश्नावर हे उत्तर दिले. तुझा आजपर्यंतचा आवडता फलंदाज कोण?, असा तो प्रश्न होता.
I think it is got to be @ABdeVilliers17 https://t.co/tIZuSPos5A
— K L Rahul (@klrahul) May 10, 2020
यावर राहुलने तो एबी डिविलियर्स असल्याचे सांगितले.
केएल राहुल व एबी डिविलियर्स हे आयपीएलमध्ये एकमेकांचे संघसहकारी देखील राहिले आहेत. राहुल काही हंगाम हा एबी डिविलियर्स ज्या संघात होता त्या आरसीबीचा भाग राहिला होता.
केएल राहुल भारताकडून ३६ कसोटी, ३२ वनडे व ४२ टी२० सामने खेळला आहे. त्यात त्याने कसोटीत २००६, वनडेत १२३९ तर टी२०मध्ये १४६१ धावा केल्या आहेत.