---Advertisement---

“मी चुकांमधून शिकलोय”, इंग्लंड दौऱ्यावर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूने व्यक्त केल्या भावना

---Advertisement---

भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण फलंदाज केएल राहुलने मागील दोन वर्षापासून मर्यादित षटकांच्या संघात नियमित सदस्य म्हणून जागा पटकावली आहे. त्याने काही काळ संघाचा यष्टीरक्षक म्हणून देखील जबाबदारी पार पाडली. मात्र, तो मागील जवळपास तीन वर्षापासून कसोटी खेळलेला नाही. सध्या इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघाचा तो भाग आहे. इंग्लंड विरुद्ध होणारी पाच कसोटी सामन्यांची मालिका आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे याबाबत नुकतीच त्याने माहिती दिली.

“मी चुकांवर काम केले”
बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये बोलताना राहुल म्हणाला, “मी २०१८ मध्ये ज्यावेळी संघातून बाहेर पडलो त्यावेळी चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न केला. माझ्या प्रशिक्षकांकडे जाऊन मार्गदर्शन घेतले. अनेक व्हिडिओ पाहिले व माझे काय चुकत आहे यावर काम केले. अपयश हे आपल्याला आणखी मजबूत बनवत असते. पुढे येणाऱ्या अनेक संधींसाठी मी उत्सुक आहे.”

राहुल आपल्या पहिल्या इंग्लंड दौऱ्याचा अनुभव सांगताना म्हणाला, “ओव्हल येथील खेळपट्टी संपूर्ण मालिकेतील फलंदाजीसाठी सर्वात उपयुक्त खेळपट्टी होती. मला माहीत होते की, ही मालिकेतील अखेरची कसोटी आहे आणि यामध्ये मी चांगले केले नाही तर, संघातून बाहेर देखील पडू शकतो. यातूनच प्रेरणा घेत मी शतक साजरे केले.”

राहुल याने २०१८ इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या नऊ डावात केवळ १४९ धावा बनविल्या होत्या. मात्र, ओव्हल कसोटीच्या अखेरच्या दिवशी त्याने १५० धावांची लाजवाब खेळी केलेली.

दीर्घकाळापासून आहे कसोटी संघाबाहेर
राहुल २०१९ वेस्ट इंडीज दौऱ्यापासून आंतरराष्ट्रीय कसोटी खेळलेला नाही. त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली असून, तो मधल्या फळीतील फलंदाज एक करताना दिसू शकतो. काउंटी एकादश संघाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात त्याने नाबाद शतकी खेळी केली होती. राहुलने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ३६ कसोटी सामन्यात ३४.५८ च्या सरासरीने २००६ धावा ठोकल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंडमध्ये कसोटीतही होणार का सूर्यकुमारचा ‘उदय’? ‘या’ ३ खेळाडूंच्या ऐवजी मिळू शकते ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी

‘हे’ ३ विकेटकीपर पंतसाठी आहेत धोक्याची घंटा! यष्टीपुढे अन् यष्टीमागे प्रदर्शनात आहेत त्याच्या बरोबरीचे

आक्रमक फलंदाजी बनलीय ‘या’ खेळाडूंची ओळख, वनडेत १२०पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने कुटल्यात धावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---