विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारत विरुद्ध इंग्लंड याच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका भारताने ३-१ ने जिंकली आहे. शनिवारी (०६ मार्च) अहमदाबाद येथे झालेला चौथा कसोटी सामना एक डाव आणि २५ धावांनी जिंकत भारताने मालिका विजयावर शिक्कामोर्तब केला. याबरोबरच भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. सोबतच सर्वाधिक गुणांची कमाई करत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या यादीत अव्वलस्थानी उडी घेतली आहे. यानंतर भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल याने कर्णधार कोहलीविषयी मोठा खुलासा केला आहे.
मागील २ वर्षात कधीही मानली नाही हार
राहुल म्हणाला की, “जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवणे हे कर्णधार कोहली आणि पूर्ण संघाचे लक्ष्य होते. यामुळे मागील २ वर्षांपासून भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत हार मानली नाही. अखेर त्याचे फळ संघाला मिळाले आहे.”
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबाबत बोलताना कोहलीने सांगितले होते की, “गेल्या २ वर्षांपासून आम्ही कसोटीत ज्या पद्धतीने प्रदर्शन केले आहे. ते पाहता आम्हाला अंतिम सामन्यात पोहोचण्याचे हक्कदार होतो. आता आमचे पूर्ण ध्यान न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यावर अर्थात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर आहे.”
लॉर्ड्सवर होणार अंतिम सामना
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १ ऑगस्ट २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. भारतीय कसोटी संघाचे या स्पर्धेत एकूण ६ कसोटी मालिका खेळल्या असून त्यापैकी ५ मध्ये विजय मिळवला आहे. उर्वरित एक पराभूत कसोटी मालिका न्यूझीलंडविरुद्ध झाली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना यावर्षी जून महिन्यात १८ जून ते २२ जून दरम्यान साउथम्पटनच्या मैदानावर खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गप्टिलने ऑस्ट्रेलियाला चोप चोपलं; रोहितला पछाडतं टी२० क्रिकेटमध्ये केला ‘स्पेशल रिकॉर्ड’
दे घुमा के! मार्टिन गप्टिलच्या जबरा सिक्सरचा चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर, व्हिडिओ व्हायरल
४६ वर्षीय शाहिद आफ्रिदीच्या मुलीचा ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरबरोबर साखरपुडा