---Advertisement---

3 सध्याचे भारतीय फलंदाज मेलबर्नच्या मैदानावर आजपर्यंत एकही शतक, अर्धशतक झळकावू शकले नाहीत

On: शुक्रवार, डिसेंबर 20, 2024 2:58 PM
---Advertisement---

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळली जात आहे. ब्रिस्बेनमध्ये दोन्ही संघांमध्ये खेळलेला तिसरा कसोटी सामना ड्राॅ राहिला. या सामन्यानंतर, दोन्ही संघ आता (26 डिसेंबर) पासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर चौथ्या कसोटी सामन्यासाठी आमने-सामने असणार आहेत.

मेलबर्न येथील एमसीजी येथे होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघही सज्ज झाला आहे. भारतीय संघातील सध्याच्या फलंदाजांमधील काही बॅट्समनचा या मैदानावर अप्रतिम रेकॉर्ड आहे. पण असे काही फलंदाज आहेत ज्यांना या मैदानावर कधीही शतक किंवा अर्धशतक झळकावता आले नाही. या बातमीद्वारे आपण त्या 3 सध्याच्या भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.

1) रिषभ पंत- भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ‘रिषभ पंत’ची (Rishabh Pant) आतापर्यंतची कसोटी कारकीर्द चमकदार आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने कसोटीमध्ये भारतासाठी खास स्थान निर्माण केले आहे. पंतने आत्तापर्यंतच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यांत प्रभावी कामगिरी केली आहे, मात्र आतापर्यंत मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पंतने एमसीजीमध्ये 2 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 39, 33 आणि 29 धावा केल्या आहेत.

2) शुबमन गिल- भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) आता भारतीय संघासाठी सर्वात महत्त्वाचा फलंदाज बनला आहे. गिल भारतासाठी महत्त्वाचा कसोटी फलंदाज बनत आहे. गिलने 2020-21 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावरच भारतासाठी कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. एमसीजीमध्ये त्याचे पदार्पण चांगले होते, जिथे त्याने 45 आणि 35* धावांची खेळी खेळली.

3) केएल राहुल- ऑस्ट्रेलियाचा हा दौरा ‘केएल राहुल’साठी (KL Rahul) चांगला ठरत आहे. त्याने येथे काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत. राहुल आता (26 डिसेंबर) रोजी बॉक्सिंग डे कसोटीत मेलबर्नच्या त्याच मैदानावर खेळणार आहे जिथून त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. एमसीजीमधील पदार्पणाच्या कसोटीत राहुल काही करू शकला नाही आणि त्याला केवळ 3, 1 धाव करता आली. त्यानंतर आता तो तब्बल 10 वर्षांनंतर या मैदानावर पुन्हा खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बंड्या मारुती, अमर क्रीडा यांची चुरशीच्या लढतीनंतर उपांत्यपूर्व फेरीत धडक
पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून का वगळलं? अधिकारे म्हणाले, “तो रात्रभर बाहेर…”
निवृत्तीनंतर 2 महान दिग्गजांचा फोन आल्यावर काय म्हणाला अश्विन? “मला हृदयविकाराचा झटका…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---