---Advertisement---

IND vs AUS; गाबा कसोटीत शानदार खेळी केल्यानंतर, केएल राहुल म्हणाला…

---Advertisement---

सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन, गाबाच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान ‘केएल राहुल’ने (KL Rahul) गाबा कसोटीत शानदार खेळी केली. राहुलच्या खेळीमुळे भारतीय संघाला फॉलोऑन टाळता आला. त्याने 139 चेंडूंत 84 धावा केल्या. दरम्यान त्याने 8 चौकार लगावले.

एकीकडे भारतीय संघ सतत विकेट गमावत होता, तर दुसरीकडे केएल राहुल क्रीजवर उभा होता. आता या शानदार खेळीबाबत राहुलने वक्तव्य केले आहे.

चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर राहुल म्हणाला, “पाहा, मला खात्री आहे की, प्रत्येकाची स्वतःची योजना आहे. टॉप ऑर्डरचा फलंदाज म्हणून तुम्हाला थोडे नशीब हवे आहे. पहिल्या 10-15 षटकांमध्ये थोडा आत्मविश्वास येतो. मग तुम्हाला चांगले वाटू लागते आणि सुरुवात केली जाते. ऑस्ट्रेलियात कुकाबुरा चेंडूचा वेग आणि उसळी घेऊन खेळण्याचा आनंद घेत आहे.”

पुढे बोलताना केएल राहुल म्हणाला, “प्रत्येकजण त्या पहिल्या 20-30 चेंडूंचा सामना करत आहे आणि प्रत्येकजण ते करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ही एक लांबलचक मालिका आहे. पहिल्या 30 षटकांमध्ये तुम्ही फक्त एकच गोष्ट करू शकता जे तुम्ही करू शकता. तुमचा बचाव मजबूत करा. प्रथम 30 षटके हा गोलंदाजाचा वेळ आहे. त्यांचा आदर करा, चेंडू सोडा, शक्य तितके घट्ट खेळण्याचा प्रयत्न करा.”

शेवटी बोलताना केएल राहुल म्हणाला, “हे खूप महत्वाचे आहे. फक्त माझ्यासाठीच नाही तर दोन्ही बाजूंच्या सलामीवीरांसाठी. आम्ही ॲडलेडमध्ये देखील पाहिले जेव्हा मॅकस्विनी आणि लाबुशेन यांनी रात्री चांगला खेळ केला, त्यांनी चांगले लांबीचे चेंडू टाकले. ऑस्ट्रेलियाबद्दल ही चांगली गोष्ट आहे की, जर तुम्हाला वेग आणि उसळीची सवय असेल तर तुम्ही गेल्या सामन्यात आम्हाला दिलेल्या बाऊन्सवर विश्वास ठेवू शकता.”

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर 5 दिवसांचा खेळ संपल्यानंतरही भारतीय संघ या सामन्यात मागे आहे. चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 252/9 धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आकाश दीप (Akash Deep) संघासाठी नाबाद परतले. दोघांनी 10व्या विकेटसाठी नाबाद 39 धावांची भागीदारी रचली.

‘आकाश दीप’ने (Akash Deep) 31 चेंडूत मदतीने 27 धावा केल्या. दरम्यान त्याने  2 चौकारांसह 1 षटकार मारला. तर ‘जसप्रीत बुमराह’ने (Jasprit Bumrah) 27 चेंडूत 10 धावा केल्या. दरम्यान त्याने 1 षटकार मारला. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघ 193 धावांनी मागे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS; मोहम्मद सिराजवर भडकले सुनील गावसकर? नेमकं कारण काय?
IND vs AUS; पाचव्या दिवशी कसे असणार ब्रिस्बेनचे हवामान? पाऊस घालणार खोळंबा?
शिखर धवनचे गोलंदाजांवर वर्चस्व, झळकावले तुफानी शतक!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---