भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांची ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता तर दुसरा सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे.
भारताला या मालिकेत सलामीवीरांना येत असलेल्या अपयशामुळे मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. भारताचे महान माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनीही कडक शब्दात भारताचा सलामीवीर फलंदाज केेएल राहुलवर आणि संघ निवडीवर टीका केली आहे.
त्याचबरोबर गावसकर केएल राहुलबद्दल म्हणाले, ‘केएल राहुलला जोपर्यंत कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त होत नाही तोपर्यंत खेळण्याची कोणतीच संधी नाही. मला वाटते त्याने परत यावे आणि कर्नाटकासाठी रणजी ट्रॉफी खेळावी. तो फक्त चांगल्या लयीत नाही असेल नाही तर तो तिथे खरा नाहीच आहे. तो मला खोटे ठरवू शकतो आणि मला मी जर भारतीय संघाच्या भल्यासाठी खोटा ठरणार असेल तर मला आनंदच होईल.’
‘मी असे म्हणत नाही की मला सर्व माहित आहे, पण भारतीय संघासाठी ही चांगली गोष्ट आहे की त्यांनी राहुलला परत पाठवावे आणि त्याला रणजी सामने खेळायला लावावे. त्यामुळे त्याच्यामध्ये या सर्वातून बाहेर येण्यासाठी आत्मविश्वास मिळेल. जर तो संघाबरोबर पर्थमधून मेलबर्न आणि मेलबर्नमधून सिडनीला प्रवास करणार असले, तर त्यात काहीच अर्थ नाही.’
तसेच बीसीसीआयने मेलबर्न आणि सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी हार्दिक पंड्याची संघात निवड केली आहे. तसेच दुखापतग्रस्त पृथ्वी शॉ ऐवजी मयंक अगरवालचा समावेश केला आहे.
त्याबद्दल बोलताना गावसकर म्हणाले, ‘खर तर 19 जणांच्या संघाची काय गरज आहे. यामागे काय विचार आहे हे समजणे मला कठीण जात आहे आणि हे मागील दीड वर्षापासून होत आहे. आपण भारतात परत आलो आणि जिंकायला सुरुवात केली की कोणीही परदेशातील निकालांचा विचार करत नाही.’
त्याचबरोबर गावसकरांनी ऑस्ट्रेलिया तील तळातल्या फलंदाजांनी जे केले ते आपल्या फलंदाजांना का करता आले नाही हा प्रश्न उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर मार्कस हॅरिस आणि अॅरॉन फिंच यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र भारताच्या सलामीवीर मुरली विजय आणि राहुलला धावा करण्यात अपयश आले.
याबद्दल गावसकर म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियाकडून मार्कस हॅरिस आणि अॅरॉन फिंच यांनी चांगली सलामी भागीदारी केली. हीच भागीदारी सामन्यात महत्त्वाची ठरली. कारण खेळपट्टीवर गवत आणि उसळ होती. त्यांनी ज्याप्रकारे चौकार मारले आणि स्ट्राइक रोटेट करत एकएक धाव चोरली ते महत्त्वाचे होते. त्यांनी कोणत्याही भारतीय गोलंदाजांना सलग 6 चेंडू निर्धाव टाकू दिले नाही. त्यामुळे खूप मोठा फरक पडतो.’
महत्त्वाच्या बातम्या:
–२०१९ च्या आयपीएल लिलावात या ६० खेळाडूंवर लागली बोली
–एक वेळ विराट बरोबर सेल्फी काढण्याचे होते स्वप्ऩ आता खेळणार विराटच्याच संघात…
–असे असतील २०१९ च्या आयपीएलसाठी सर्व संघ…