मुंबई। आयपीएलच्या 15व्या हंगामात धुवांधार कामगिरी करणारा नवा संघ लखनऊ सुपर जायंट्सचा प्रवास प्लेऑफमध्ये जाऊन संपला. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनऊला 14 धावांनी पराभूत केले. पहिल्याच हंगामात सर्वांचं कौतुक मिळवलेल्या लखनऊची पहिली विकेट तेव्हा पडली, जेव्हा केएल राहुल (79 धावा, 58 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार) याचा सलामीवीर सहकारी क्विंटन डी कॉक (6 धावा) याला सिराजने पहिल्या ओव्हरमध्ये परत पाठवलं.
अर्थात, जे काही झालं, तो सामन्याचा एक भाग आहे. जो एक कुणी जिंकणार, दुसरा हारणार हे ठरलेलं आहे. मात्र, या सगळ्यांपलीकडे मोलाची कामगिरी बजावण्यासंदर्भाने केएल राहुलची एक वेगळीच प्रतिमा चाहते आणि प्रेक्षकांच्या मनात आहे. स्वदेशी बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग मंच, ‘कू’च्या माध्यमातून केएल राहुलने (KL Rahul) आभार मानताना एक भावनिक संदेश लिहिला.
“माझ्या चहूबाजूंना मला प्रेरणा दिसते आहे. एक विशेष पहला हंगाम आता संपतो आहे. आम्हाला हवं होतं ते घडलं नाही. मात्र, आम्ही शेवटपर्यंत सगळी ताकद लावली. एलएसजी परिवार, आमचे सर्व सहयोगी कर्मचारी, संघ व्यवस्थापन आणि डॉ. गोयंका यांचे धन्यवाद. शेवटी, तुम्ही सगळ्यांनी चाहते म्हणून पहिल्या हंगामात आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला, त्यासाठी खूप आभार! आम्ही लवकरच परत येऊ!”
हा लखनऊ सुपर जायंट्स का पहला हंगाम होता. मात्र संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. लीगच्या सामन्यांबाबत बोलायचं तर, लखनऊची संघ पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. या संघाने 14 सामन्यांपैकी 9 मध्ये विजय मिळवला होता. प्लेऑफ मध्ये संघ एलिमिनेटरपर्यंत पोचला. मात्र रॉयल चॅलेंजर्स बेंगलौरकडून या संघाला पराभव पत्करावा लागला. तरीही संघासाठी केएल राहुल, मोहसिन खान, आयुष बदोनी अशा खेळाडूंनी पूर्ण हंगामभर उत्कृष्ट खेळ केला.
केएल राहुलने केलं एक अनोखं रेकॉर्ड
आईपीएलच्या 15व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करू शकली नाही. मात्र, कर्णधार केएल राहुलने मात्र स्वतःच्या नावे एक मोठं रेकॉर्ड बनवलं आहे. राहुल चार हंगामात 600 पेक्षाही जास्त धावा काढणारा फलंदाज बनला आहे. केएल राहुलने ख्रिस गेल आणि डेविड वॉर्नरचाही विक्रम तोडला आहे. हे दोघेही 3 हंगामांमध्ये 600 हून जास्त धावा बनवणारे खेळाडू आहेत.
महा स्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘चूका कर आणि लोकांसमोर अपयशी हो’, अश्विनला भारताच्या माजी प्रशिक्षकाने दिलेला अनोखा गुरूमंत्र
संजू सॅमसनला बेंगलोरच्या ‘या’ दोन गोलंदाजांपासून राहावं लागेल सावध, बनू शकतात राजस्थानचा काळ
मैदानात घुसलेल्या चाहत्याला पोलिसांनी थेट उचललं खांद्यावर, विराटही झाला चकीत; Video व्हायरल