दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ११३ धावांनी जोरदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० ची विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात तुफानी शतकी खेळी करणाऱ्या केएल राहुल याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या सामन्यानंतर त्याने आपल्या यशाचे रहस्य उघड केले आहे. (KL Rahul century)
केएल राहुलने दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात १२३ धावांची खेळी केली. हे यश मिळवण्यामागील खरे कारण म्हणजे, त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंसोबत छेडछाड करणे टाळले. याचा रणनीतीचा वापर त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात देखील केला होता. या सामन्यात देखील तुफानी शतक झळकावले होते. आता त्याच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाला सेंच्युरियनमध्ये विजय मिळवता आला आहे.
सामना झाल्यानंतर त्याने म्हटले की, “ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचा मी भरपूर आनंद घेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंना सोडण्याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. मला माहित आहे की, आम्ही वनडे आणि टी२० क्रिकेट जास्त खेळतो. मैदानाच्या चारही बाजूंना शॉट मारणे हा एक चांगला अनुभव असतो. परंतु, जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट खेळता, त्यावेळी तुम्हाला शिस्तबद्ध होऊन खेळावे लागते. योग्य चेंडूची वाट पाहावी लागते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जेव्हा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून तुमच्यावर दबाव आणला जातो, त्यावेळी चुका होतात. या वर्षी इंग्लंडमध्ये पुन्हा कसोटी सामने खेळल्यानंतर मला बचावात्मक शॉट्स खेळण्यात आणि गोलंदाजांना थकवण्याचा आनंद मिळाला.”
अधिक वाचा – ‘सलामीवीर’ राहुलच्या तळपत्या बॅटची जादू द. आफ्रिकेतही दिसली, शतक करत मोठ्या दिग्गजांना मागे टाकले
केएल राहुलने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ७ शतक झळकावले आहेत. त्यापैकी ६ शतक हे परदेशात झळकावले आहेत. या ६ शतकांपैकी सेंच्युरियनमध्ये झळकावलेले शतक कितवे स्थान देशील? याबाबत बोलताना केएल राहुल म्हणाला की, “परिस्थिती आणि खेळपट्टी लक्षात घेता, ते आव्हानात्मक होते. त्यामुळे ही खेळी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शतक झळकावून संघाला विजय मिळवून देण्यासाठी खूप धाडस, जिद्द आणि शिस्त लागते. त्यामुळे हे शतक खूप महत्वाचं आहे.”
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसरा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान जोहान्सबर्ग येथे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टार क्रिकेटर क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटला केला अलविदा
हे नक्की पाहा :