---Advertisement---

भारताने सामना गमावला, पण केएल राहुलच्या ‘या’ कॅचची सर्वत्र होतेय चर्चा

KL Rahul's Spectacular Catch
---Advertisement---

भारत आणि बांगलादेश या संघात दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (दि. 7 डिसेंबर) ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात भारताला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशच्या मेहेदी हसन मिराज याने संघाला अवघड परिस्थितीतून बाहेर काढत आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याच्या या शतकाच्या जोरावर बांगलादेश संघ 271 धावांपर्यंत मजल मारु शकला. बांगलादेश संघाचे 19व्या षटकात 69 धावसंख्येवर 6 गडी बाद झाले होते. ज्यानंतर मेहेदी हसन आणि मेहमदुल्लाह यांनी 148 धावांची भागीदारी केली. मात्र. ही धमाकेदार भागीदारी तोडण्याचेे काम केएल राहुल याने केले.

राहुलच्या कॅॅचने तुटली भागीदारी
राहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुल (KL Rahul) याच्यावर आली. राहुलने घेतलेल्या कॅचमुळे मेहमदुल्लाह (Mehmadullah) आणि मेहेेदी हसन (Mehidy Hasan) यांची भागीदारी तुटली. रिषभ पंत (Rishabh Pant) संघाबाहेेर असल्याने राहुल यष्टीरक्षण करतोय. 47व्या षटकात उमरान मालिक (Umran Malik) याच्या चेंडूवर मेहमदुल्लाह (Mehmadullah) याने ऑफ साईडला फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा फटका मारण्यासाठी त्याला पुरेशी जागा उपलब्ध नव्हती, ज्यामुळे चेंडू बॅटला घासून मागच्या बाजूला गेला. चेंडू राहुलपासून बराच लांब होता. मात्र, त्याने उडी मारत एका हाताने चेंडू पकडला. त्याच्या या कॅचमुळे 148 धावांच्या या भागीदारीला पूर्णविराम मिळाला.

भारताविरुद्ध विक्रमी भागीदारी
ही भारताविरुद्ध सातव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी होती. मेहेदी हसन याने नासुम एहमद (Nasum Ahmad) याच्यासोबत आठव्या विकेटसाठी 23 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. बांगलादेश संघला शेवटच्या 10 षटकात जलद 102 धावा करण्यात यश आले. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, ज्याने 37 धावा देत 3 गडी बाद केले. उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे 58 आणि 73 धावा देत 2-2 गडी बाद केले.(KL Rahul took a spectacular catch which is gone viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना गमावला, पण श्रेयस अय्यरने करून दाखवला नाद पराक्रम; विराट अन् धोनीला पछाडत बनला अव्वल फलंदाज
भारताच्या जखमी वाघाने रचला इतिहास! ‘या’ विक्रमात बनला जगातला दुसरा, तर टीम इंडियाचा पहिलाच फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---