---Advertisement---

Asia Cup 2022: विराट, राहुलचे संघपुनरागमन! कॅप्टन रोहितचे वाढले टेंशन, जाणुन घ्या कारण

On: शनिवार, ऑगस्ट 13, 2022 12:24 PM
Virat-Kohli-Rohit-Sharma-KL-rahul
---Advertisement---

भारतीय संघाची आगामी एशिया कप (Asia Cup) आणि टी२० विश्वचषक या स्पर्धांसाठी जोरात तयारी सुरू आहे. एशिया कपसाठी भारताच्या १५ जणांचा संघ घोषित झाला. यामध्ये केएल राहुल आणि विराट कोहली यांनी संघात पुनरागमन केले आहे. मागील वर्षी जेव्हा टी२० विश्वचषक झाला तेव्हा भविष्यात विराटच्या बाबतीत एवढ्या चर्चा होतील याचा कोणीही विचार केला नसेल. विश्वचषकाआधी एशिया कप होणार असून विराट संघात परतला आहे. यामुळे भारतासमोर एक वेगळेच संकट उभे राहिले आहे.

विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या येण्याने संघातील पहिल्या तीन क्रमांकाची फलंदाजी निश्चित झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या सोबत सलामीला राहुल फलंदाजी करणार, तर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार. सुरूवातीच्या फलंदाजीचा क्रम जरी निश्चित झाला असला तरी सध्या हे दोघे संघात नाही, जर ते अंतिम अकरा मध्ये आले तर कोणत्या खेळाडूला बाहेर बसवावे ही नवी अडचण संघासमोर निर्माण झाली आहे.

रोहित, राहुल आणि विराट ही टॉप ऑर्डर असेल, तर सूर्यकुमार यादव, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यापैकी एकाची जागा धोक्यात येणार आहे. तसेच हे तिन्ही खेळाडू मागील काही टी२० सामन्यांमध्ये चमकदार ठरले आहेत. तसेच भारतीय संघाचा खेळ मागील काही सामन्यांमध्ये बदलला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारत आक्रमक खेळ करत आहे.

अंतिम अकराच्या गेम प्लानमध्ये रोहित-राहुल-विराट ही तिकडी बरोबर बसते. मात्र एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणते रोहित, राहुल, विराट, सूर्यकुमार, रिषभ आणि दिनेश हे पहिले सहा खेळाडू असले, तर हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा यांच्यापैकी एकाला निवडावे लागणार आहे. यानंतर गोलंदाज निवडण्याची वेळ येते. तेथेही बरेच पर्याय आहेत. आता अंतिम अकरामध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘भारत जगातील सर्वात मजबूत संघ, पण आम्हीही…’, वनडे मालिकेपूर्वी झिम्बाब्वेच्या प्रशिक्षकाची हुंकार

जेव्हा पाकिस्तानी यष्टीरक्षकाला मारायला निघालेला गौतम गंभीर, पण कॅप्टनकुलने शांत केलेले वातावरण

डाव्या हाताने क्रिकेटमध्ये उजवी कामगिरी करणारे दिग्गज भारतीय खेळाडू, पाहा खास आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---