भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. यानंतर केएल राहुल आणि शुबमन गिल या जोडीनं अर्धशतकी भागीदारी करत संघाला सांभाळलं. मात्र एक वेळ अशी आली होती, जेव्हा राहुल खातं न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतणार होता, पण तिसऱ्या अंपायरच्या तत्परतेमुळे त्याला जीवदान मिळालं. राहुलला या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही आणि तो 37 धावांवर मिचेल स्टार्कचा बळी ठरला.
केएल राहुलला जीवदान मिळाल्याची घटना डावाच्या 8व्या षटकात घडली. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर आलेल्या स्कॉट बोलंडनं राहुलला आपल्या जाळ्यात अडकवलं. राहुल पहिल्याच चेंडूवर विकेटच्या मागे झेलबाद झाला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाताच राहुल निराश झाला आणि पॅव्हेलियनच्या दिशेनं जाऊ लागला. पण त्यानंतर अंपायरनं त्याला थांबवलं आणि तिसऱ्या पंचाच्या सल्ल्यानुसार बोलंडचा चेंडू नो बॉल घोषित करण्यात आला.
अशा प्रकारे राहुलला जीवदान मिळालं. पण काही वेळानं स्निको मीटरवर दिसलं की चेंडू केएल राहुलच्या बॅटला लागलाच नव्हता. याचाच अर्थ राहुल आऊट न होता पॅव्हेलियनमध्ये परतत होता. तिसऱ्या अंपायरनं तो चेंडू नो बॉल घोषित केला नसता तर राहुल आऊट न होता पॅव्हेलियनमध्ये परतला असता. या घटनेचा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता.
‘KL’ucky Rahul! 😮💨#ScottBoland’s dramatic start to the #PinkBallTest: No-ball dismissal of #KLRahul on the first delivery and a dropped catch on the fifth ball! 🏏🎭
Will he make it BIG now? 👀#AUSvINDOnStar 2nd Test 👉 LIVE NOW on Star Sports! #AUSvIND | #ToughestRivalry pic.twitter.com/dCYLDKv2Pd
— Star Sports (@StarSportsIndia) December 6, 2024
राहुल या संधीचा जास्त फायदा उचलू शकला नाही. तो 64 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कनं मॅकस्विनीच्या हाती झेलबाद केलं. राहुलनं आपल्या खेळीत 6 चौकार लगावले. वृत्त लिहेपर्यंत भारतानं 35 षटकांत 6 गडी गमावून 118 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
ॲडलेड कसोटीत वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आर अश्विनला संधी का मिळाली? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या
स्टार्कशी पंगा नको रे बाबा! पर्थ कसोटीत स्लेज करणारा जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद
6 डिसेंबरला जन्मलेल्या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, जसप्रीत बुमराहसह अनेक दिग्गजांचा समावेश