डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) सुरु होणार आहे. या दौऱ्यासाठीच्या कसोटी संघाची घोषणा बुधवारी (८ डिसेंबर) करण्यात आली. या दौऱ्यासाठी १८ सदस्य संघासह चार राखीव खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील.
त्याचबरोबर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्मा (Rohit Sharma) याला भारताच्या वनडे संघाचा पूर्णवेळ कर्णधार (India New ODI Captain Rohit Sharma) म्हणून नियुक्त केले. तो विराट कोहली याची जागा घेईल. त्याचवेळी वनडे संघाचा उपकर्णधार कोणाकडे देण्यात येणार आहे, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
हा खेळाडू बनू शकतो वनडे संघाचा उपकर्णधार
रोहित शर्मा याआधी भारताच्या टी२० व वनडे संघाचा उपकर्णधार होता. मात्र, आता त्याची कर्णधारपदी बढती झाल्याने उपकर्णधाराची जागा रिक्त झाली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, सध्या बीसीसीआयकडे केएल राहुल (KL Rahul) व रिषभ पंत (Rishabh Pant) हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी राहुल याच्याकडे उपकर्णधारपद सोपवले जाऊ शकते. तसेच, पंत हा संघाच्या निर्णय प्रक्रियेत भाग घेऊ शकतो.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले आहे,
“राहुल टी२० सह वनडे संघाचा कर्णधार होणे जवळपास निश्चित झाले आहे. (KL Rahul ODI Vice Captain) त्याच्याकडे अजून ६-७ वर्षाचे क्रिकेट बाकी असल्याने तो भविष्यात संघाचे नेतृत्वदेखील करेल. रोहित, विराट व प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात तो खूप काही शिकू शकतो.”
या अधिकाऱ्याने पुढे बोलताना म्हटले,
“सर्वजण रिषभमध्ये भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहत आहेत. तो संघाच्या निर्णय प्रक्रियेत भाग घेऊ शकतो. त्याच्यासाठी बीसीसीआय दीर्घकालीन योजना आखत आहे.”
टी२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर विराट कोहलीच्या जागी रोहितची टी२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीने शेअर केला ‘८०च्या दशकातील मुलां’चा फोटो; लिहिले, ‘एकेकाळची गोष्ट आहे…’
वनडेतील नेतृत्व बदलावर काय म्हणाले शास्त्री गुरूजी? वाचा सविस्तर
स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याने झाली अजिंक्यची उपकर्णधार पदावरून गच्छंती; ‘ही’ आहेत कारणे